आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओळखपत्राशिवाय रेल्‍वेच्‍या एसी डब्‍यात प्रवास केल्‍यास दंड!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- एसी कोचमध्‍ये (वातानु‍कूलित डब्‍बा) दुस-याच्‍या नावावर असलेल्‍या आरक्षित तिकिटावर प्रवास करणे आता महागात पडणार आहे. कोणत्‍याही एसी क्‍लासमधून प्रवास करताना प्रवाशांनी ओळखपत्र जवळ बाळगणे, असा नियम आहे. तरी मोठया संख्‍येने ओळखपत्राशिवाय प्रवासी आढळून आले आहेत. परंतु, आता विनाओळख पत्राशिवाय एसी डब्‍यातून प्रवास करणा-या प्रवाशांना दंड करण्‍याचा निर्णय रेल्‍वे प्रशासनाने केला आहे.
येत्‍या 15 फेब्रुवारी 2012 पासून हा नियम संपूर्ण देशभरात लागू करण्‍यात येणार आहे. तिकिट दलाल एकाच्‍या नावाने आगाऊ तिकिट काढून जास्‍तीचे पैसे घेऊन ते दुस-याला विकतात. त्‍यामुळे तिकिटदलालांची दुकानदारी बंद करण्‍यासाठी रेल्‍वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
आतापर्यंत फक्‍त तात्‍काळ आणि इंटरनेट तिकिटासाठीच ओळखपत्राची सक्‍ती होती. परंतु, रेल्‍वे प्रवासी आणि खासदारांकडून आलेल्‍या तक्रारीनंतर रेल्‍वे मंत्रालयातून आलेल्‍या आदेशानुसार ओळखपत्राशिवाय प्रवास करणा-यांवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याचा इशारा रेल्‍वे मंडळाने दिला आहे.
झटका महागाईचाः आता रेल्‍वे प्रवासभाड्याची टांगती तलवार