आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योग क्षेत्र : वोक्हार्टचा वाळूजमधील प्रकल्प दुसरीकडे हलणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंग्लंडच्या औषध व आरोग्यविषयक उत्पादन नियंत्रक संस्थेने (एमएचआरए) वोक्हार्ट कंपनीच्या वाळूजमधील निर्यात प्रकल्पावर आयातीसंदर्भातील अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र हलवण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कंपनीला वर्षाकाठी 100 दशलक्ष डॉलरचे नुकसान होणार आहे.


वोक्हार्टचे चेअरमन हबील खोराकीवाला म्हणाले, वाळूज निर्यात प्रकल्पाबाबत इंग्लंडच्या एमएचआरए या संस्थेने अतिसतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाळूजच्या प्रकल्पातील उत्पादन हलवण्यात येईल. या प्रकल्पात इंजेक्शन व इतर औषधे तयार होतात. याच प्रकल्पावर अमेरिकेच्या आरोग्य नियंत्रक संस्थेने मेमध्ये आक्षेप नोंदवला होता. अमेरिकेच्या अन्न व औषधी संस्थेच्या (यूएसएफडीए) वाळूज प्रकल्पावरील आक्षेपाला खोराकीवाला यांनी
दुजोरा दिला.