आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीसाठी महिला बँक देणार कर्ज; गारपीटग्रस्त भागातील शेतकर्‍यांना मदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातल्या बीड, उस्मानाबाद, नांदेडमधील कोरडवाहू शेती करणार्‍या शेतकर्‍यांसाठी भारतीय महिला बॅँकेने आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. बचत गटांच्या माध्यमातून कोरडवाहू शेती करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे बॅँकेने म्हटले आहे.

भारतीय महिला बॅँकेने 3400 बचत गटांच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यास सुरुवात केली असून त्याचा लाभ साडेतीन हजार सदस्यांपर्यंत पोहोचला आहे. हा उपक्रम गेल्या महिन्यात सुरू झाल्याची माहिती बॅँकेच्या उपमहाव्यवस्थापक नलिनी र्शीरामन यांनी दिली. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्यास बॅँकाही हात आखडता घेतात; महिला आर्थिक विकास महामंडळाच्या या उपक्रमातून असंघटित क्षेत्रातून कर्ज उचलण्यापासून शेतकर्‍यांना मूक्त होता येणार आहे. या उपक्रमासाठी भारतीय महिला बँकेची साथ मिळाली आहे.

12 टक्के व्याजाने कर्ज : बचतगटांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना आर्थिक पुरवठा करण्यात येईल आणि त्यानंतर एक ठरावीक निधी स्थापन करून अंतर्गत कर्ज पुरवठा करण्यासाठी मदत केली जाईल. केवळ शेतीच नाही शेतीपूरक कामासाठी देखील कर्ज पुरवठा केला जाणार असला तरी ते बचत गटावर अवलंबून राहील. हे कर्ज 12 टक्के व्याजाने देण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना 26 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा मानस र्शीरामन यांनी व्यक्त केला. कर्ज परतफेडीचा कालावधी साडेचार वर्षांचा राहील.