आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World Bank News In Marathi, Divya Marathi, Modi Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीएसटी लागू करा - जागतिक बँक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - केंद्रातील मोदी सरकार आपल्या पहिल्या केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्या घोषणा करते याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. परंतु जागतिक बॅँकेने मात्र अर्थसंकल्पाच्या अगोदरच आर्थिक विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकारने जीएसटीची अंमलबजावणी करण्याबरोबरच अनुदान कपात व कराचे जाळे व्यापक करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे अगोदरच्या 5.7 टक्के आर्थिक वाढीच्या अंदाजाच्या तुलनेत यंदाच्या वर्षात साडेपाच टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी, अनुदानाकडे लक्ष तसेच कर वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यास वाढीच्या दृष्टीने स्थिती बळकट
होण्यास मदत होऊ शकेल, असे बँकेला वाटते.