आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • World\'s First Bike Made From Silver Introduced In India International Jewellery Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सगळ्यात महागडी बाईक; चांदीच्या या बाईकची किंमत 50 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील भरवण्‍यात आलेल्या 'इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शो'मध्ये जगातील सगळ्यात महागडी बाईक सादर करण्‍यात आली. चांदीपासून तयार झालेल्या या बाईकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. या बाईकची किंमत 50 लाख रुपयांपासून कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. बुकिंग केल्यानंतर या बाईकची डिलिव्हरी तब्बल आठ महिन्यांनी मिळणार आहे.

हॉलमार्क चांदीचे आभुषणे तसेच घरगुती साहित्य निर्माता 'सिल्वर इंपोरिअम'ने या बाईकची निर्मिती केली आहे. या बाईकचा प्रत्येक स्पेअर पार्ट हाताने बनवला असल्याचा दावा कंपनीचे एमडी राहुल मेहता यांनी केला आहे. या बाईकचे सर्व पार्ट्‍स चांदीचे असून इंजन इनफिल्ड इंडियाचे (बुलेट) आहे.

चेअरमन कांतिलाल मेहता म्हणाले, की चांदीची बाईक पहिल्यांदा सादर करण्यात आली आहे. या बाईकचे सगळं श्रेय कारागीरांना आहे. त्यांच्या परिश्रमाचा हा आविष्कार आहे. एक बाईक तयार करण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागला. ऑर्डर दिल्यानंतर आठ महिन्यात तिची डिलिव्हरी मिळेल, असेही कांतिलाल यांनी सांगितले. जयपूर येथील प्‍लांटमध्ये या बाईची निर्मिती केली जाणार आहे.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'रस्त्यावर धावता -धावता चार्ज होऊन जाते ही बस...'