आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Worlds Slimmest Smartphone Pics And Specifications Leaked Online

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वात स्लिम Gionee Elife S5.1 चे फोटो लिक; पाहा, फोटो सोबतच फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Gionee Elife S5.1 चा लिक झालेला फोटो)
गॅजेट डेस्क - चीनी स्मार्टफोन मेकर जिओनी लवकरच जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने Gionee Elife S5.1 या स्मार्टफोनला 'world's slimmest phone' या टॅगलाईन अंतर्गत लॉन्च करण्याचा विचार केला आहे. नुकतेच या स्मार्टफोनचे फोटो इंटरनेटवर लिक झाले. मात्र, कंपनीने अधिकृतपणे अजून या स्मार्टफोनच्या लॉन्चिंगची तारीख जाहीर केली नाही. हे फोटो चीनी पब्लिकेशन CNMO ने लिक केले आहेत. जिओनीने काही दिवसांपूर्वीच एक टीजर दाखवले होते. यामध्ये कंपनीने जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन लॉन्च करण्याचा दावा केला होता. या टीजरमध्ये हा स्मार्टफोन 5 mm एवढा स्लिम सांगण्यात आला होता.
काय असतील फीचर्स
या लिक झालेल्या फोटोंसोबत या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशनबद्दलही माहीत देण्यात आली आहे. त्यानुसार -
* 4.8 इंच स्क्रीन
* 720 पिक्सल डिस्प्ले रेझोल्यूशन
* 5.1 mm जाडी
* 8 मेगापिक्सल रेअर कॅमरा
* 1.2 GHz कोर्टेक्स A7 क्वाड-कोर प्रोसेसर
* 305 GPU
* 1 GB रॅम
* 16 GB इंटरनल मेमोरी
* 2G, 3G आणि 4G सपोर्ट
* 2100 mAh बॅटरी
* अँड्रॉइड 4.3 सोबत एमिगो 2.0 यूजर इंटरफेस
पुढील स्लाईडमध्ये पाहा, जिओनी ईलाइफ 5.1 चे इतर लिक झालेले फोटो...