आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोनमध्येच काढा X-Ray, मित्रमैत्रिणींची करा मस्करी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्टफोनसाठी रोज नवनवीन अ‍ॅप्स येत असतात. काही लोकांना यातील मनोरंजन करणारे अ‍ॅप्स आवडत असतात तर काहींना कामाचे अ‍ॅप्स पसंत असतात. GOOGLE PLAY वर असे अनेक मनोरंजक अ‍ॅप्स आहेत त्यातीलच एक X-Ray Scan हे अ‍ॅप आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमध्ये हात-पाय, डोकं, बोटे यांचा एक्स रे काढू शकता.

हे अ‍ॅप GOOGLE PLAYवर मोफत उपलब्ध आहे. 225KB चे हे अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी तुमच्याकडे अ‍ॅन्ड्राइड 2.2 किंवा त्याच्या पुढची ऑपरेटींग सिस्टम असणे गरजेचे आहे.

अपडेट झालेल्या एक्सरे स्कॅनमध्ये तुम्हाला एचडी फोटो पाहायाला मिळेल. हे अ‍ॅप केवळ मंनोरंजनासाठी तयार करण्यात आले आहे. हे अ‍ॅप काही खरा फोटो काढत नाही किंवा एक्सरेही काढत नाही. मित्रांसोबत ट्रिक खेळणा-या लोकांसाठी खास हे अ‍ॅप बनवण्यात आले आहे. हे अ‍ॅप एक्सरे काढत नाही तर फक्त शरीराच्या वेगवेगळ्या भागाचे एक्सरे फोटो दाखवते