स्मार्टफोनसाठी वेगवेगळे प्रकारच्या अॅप्स उपलब्ध आहेत. काही युजर्सला मनोरंजनाशी संबंधित अॅप्स आवडतात तर काही आपल्या कामाशी संबंधित असलेल्या अॅप्सला प्राधान्य देतात. '
गुगल प्ले'वर अशा प्रकारच्या अनेक अॅप्स उपलब्ध आहेत. यात X-Ray Scanner अॅप्स बनवण्यात आले आहे. त्याच्या मदतीने हात, पाय, डोके, हाता-पायांचा बोटांचा X Ray काढता येऊ शकतात मात्र, हे अॅप्स फक्त मनोरंजनासाठी बनवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
X Ray स्कॅनमध्ये एचडी क्वालिटीची फोटोजही क्लिक केली जातात. या फक्त कॅमेराचा वापर केला जातो. ही सगळी कॅमेर्याची मज्जा आहे. कोणताही खरा X Ray काढला जात नाही. मित्रांची गंमत करण्यासाठी हे अॅप्स बनवण्यात आले आहे. शरीरच्या वेगवेगळ्या अवयवांचे X Ray सारखी फोटो यात क्लिक केली जातात.
या अॅपच्या डाटा बेसमध्ये हाताचे पाच बोटे तसेच 6 बोटे असलेल्या हाताचे एक्स रे इमेजेस संग्रहीत करण्यात आले आहेत. यासोबत पायाचेही एक्स रे आहेत.
गुगल प्लेवर आतापर्यंत 30,077 लोकांनी या अॅप्सला रेटिंग दिले आहे. या अॅपला 5 पैकी 3.3 'स्टार' देण्यात आले आहे. तसेच 5,000,000 पेक्षा जास्त युजर्स हे अॅप्स डाउनलोड केले आहे. अँड्रॉइड 1.6 पेक्षा वरील व्हर्जनवरील ऑपरेटिंग सिस्टिम हे अॅप्स डाउनलोड करता येते.
(फोटो: X-Ray Scanner अॅपचा स्क्रीन शॉट)