आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xi Jinping News In Marathi, Chinese President, Divya Marathi

औद्योगिक वसाहतीसाठी चीनची ६.५ अब्ज डॉलर गुंतवणूक शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग बुधवारी भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात चीनकडून औद्योगिक वसाहतीसाठी ६.५ अब्ज डॉलर(सुमारे ३९६ अब्ज ९८ कोटी रुपये) गुंतवणूक केली जाण्याची अपेक्षा आहे. याशिवाय देशांतर्गत कंपन्यांसाठी ३ अब्ज डॉलरचे खरेदी करार होतील. व्यापार, आर्थिक विकास, औषध व्यवस्थापन क्षेत्रात १६ सामंजस्य करार होणार असल्याचे सूत्रांनी सांिगतले. जिनपिंग यांच्या तीनदिवसीय दौऱ्याची सुरुवात अहमदाबादेतून होणार आहे.

महाराष्ट्रात ऑटोमोबाइल इंडस्ट्रियल पार्क तसेच गुजरातमध्ये वीज पारेषण प्रकल्प स्थापन करण्याचा चीनचा प्रस्ताव आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी चिनी कंपन्या ६.५ अब्ज डॉलर गुंतवणूक करणे अपेक्षित असल्याचे अिधकाऱ्याने सांिगतले. साधारण दोन डझन चिनी कंपन्यांचा भारतीय कंपन्यांसोबत कॉपर कॅथोड, सी फूड, सुती धागे, औद्योिगक मीठ, पॉलिप्रोइलिन आदी वस्तू खरेदी करार होईल. गुंतवणूक व खरेदी करारामुळे भारत-चीन व्यापारातील अंतर कमी होण्यास मदत िमळेल. २०१३-१४ मध्ये दोन्ही देशांमध्ये ३५ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता.