आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Launches 4 New Gadgets With High Tech Features

Xiaomi ने लॉन्च केले Mi Note आणि Pro हाय-टेक स्मार्टफोन्स; Iphone 6+ ला देणार टक्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi या चायना कंपनीने अखेर आपले दोन लेटेस्ट स्मार्टफोन Mi Note आणि Note Pro लॉन्च केले आहे. याशिवाय Headphone आणि Mini Set Top Box लॉन्च केला आहे. Xiaomi Mi Note स्मार्टफोन Apple Iphone 6+ ला टक्कर देण्याची शक्यता आहे.

Xiaomi Mi Note Pro :
Xiaomi कंपनीने वर्षाच्या सुरुवातीला लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च करून बाजारात दबदबा निर्माण केला आहे. कंपनीनुसार आतापर्यंत लॉन्च झालेल्या सर्व स्मार्टफोन Mi Note Pro मध्ये स्मार्ट फीचर्स आहेत. यात 4GB रॅम आहे. या फोनची किंमत 32,900 रुपये आहे.

Xiaomi Mi Note :
Xiaomi Mi Note हा स्मार्टफोन Redmi चे नवे व्हेरिएंट आहे. या फॅबलेटमध्ये 3D कर्व्ड ग्लास बॅक पॅनल आहे. या डिव्हाइसची जाडी 6.95mm असून वजन 161 ग्रॅम आहे. फोनचा स्क्रीन 5.7 इंचाचा असून 16GBच्या व्हर्जनची किंमत जवळपास 22,903 रुपये आहे. तसेच 64GB व्हर्जनची किंमत जवळपास 27,900 रुपये आहे.

Xiaomi Mi Box Mini :
दोन स्मार्टफोनसह Xiaomi कंपनीने Mini Set Top Box देखील लॉन्च केला आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ कंटेंट स्ट्रीमिंगसाठी हा बॉक्स पॉवर अॅडॉप्टरवर फोनप्रमाणे लावता येतो.

Xiaomi Headphone :
Xiaomi कंपनीने फॅबलेट हेडफोन देखील लॉन्च केले आहे. या हेडफोनची 5,000 रुपये आहे. सर्व प्रकारचे स्मार्टफोनला हेडफोन सपोर्ट करेल. सेमीओपन हेडफोन 50mm चे मोठे स्पीकर्स आणि ओव्हर इअर आणि ऑन इअर कव्हरसोबत येतील.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, Xiaomi Mi Note आणि Xiaomi Mi Note Pro मधील फीचर्स...