नवी दिल्ली - चीनमधील कंपनी शिओमीच्या अत्याधुनिक तंत्राने युक्त असलेल्या 15 हजार एमआय-थ्री स्मार्टफोनची अवघ्या दोन सेकंदांत विक्री झाली. भारतीय ग्राहक विशेषत: युवकांच्या या स्मार्टफोनवर अक्षरश: उड्या पडल्या. कंपनीने
फेसबुकवर ही माहिती दिली. शिओमी कंपनीने ऑनलाइन किरकोळ विक्री करणार्या फ्लिपकार्टवर 15 हजार स्मार्टफोन विक्रीसाठी सादर केले होते.
या स्मार्टफोनची घोषणा कंपनीने पूर्वीच केली होती आणि अनेकांनी फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन आपल्या कार्टमध्ये समाविष्ट केला होता. विक्री सुरू होताच ज्यांच्या कार्टमध्ये नोंद होती त्यांना हा स्मार्टफोन मिळाला, मात्र ज्यांनी ऑनलाइन खरेदीचे प्रयत्न केले त्यांच्या पदरी निराशा आली.
...आणि आऊट ऑफ स्टॉक
एकाच वेळी अनेकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने फ्लिपकार्टची वेबसाइट त्या वेळी उघडत नव्हती. ज्यांना स्मार्टफोनसाठी पैसे भरण्यास सांगण्यात आले होते त्यांनी पेमेंट करेपर्यंत स्टॉक संपला होता.