आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Mi4| Company To Launch Handset Today In India

3GB रॅम आणि 13MP कॅमेरा असलेला Xiaomi Mi4 आज भारतात होणार लॉन्च

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅझेट डेस्क - चीनी स्मार्टफोन मेकर क्झिओमी कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन Mi4 आज भारतात लॉन्च होणार आहे. यानंतर कदाचित 3 फेब्रूवारीला फ्लिपकार्टच्या माध्यमातून कंपनी या फोनची विक्री सुरू करू शकते. या फोनची विक्री क्झिओमीच्या इतर स्मार्टफोन्सप्रमाणेच केली जाईल. कंपनीचे इंडिया हेड मनू जैन यांनी लॉचिंगची तारीख तर सांगितली, मात्र याची विक्री आणि किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.
20,000 पर्यंत असू शकते किंमत -
क्झिओमीने आता पर्यंत Mi4 च्या किंमतीबद्दल कोणताच खुलासा केला नसेल, परंतु तज्ज्ञांच्या मते या फोनची किंमत जवळपास 20,000 रुपयांपर्यंत असू शकते.

नुकतेच एका इव्हेंटमध्ये लॉन्च झाला Mi नोट-
भारतात जेथे जुने व्हर्जन लाँच होत आहे, तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच बिजींगमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये कंपनीने हाय-टेक फीचर्स असलेले दोन फोन Mi नोट आणि Mi नोट Pro लॉन्च केले आहेत. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत हे हॅण्डसेट्स भारतात येण्याची शक्यता आहे.
काय विशेष आहे MI 4 मध्ये
* मल्टीटास्किंगसाठी 3 GB रॅम
* 13 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा
* फुल एचडी स्क्रीन क्वालिटी
* 2.5 Ghz क्वाड-कोर प्रोसेसर
* HD गेमिंगसाठी चांगला हॅण्डसेट
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, Xiaomi Mi4 चे फीचर्स-