आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiaomi आज लॉन्च करणार Mi5 सह Redmi Note 2; वाचा Leak झालेले फीचर्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Xiaomi कंपनी आज (15 जानेवारी) आपले दोन बहुचर्चित स्मार्टफोन्स लॉन्च करणार असल्याची माहिती मिळाली आहे. बीजिंगमध्ये एका इव्हेंटमध्ये Xiaomi Mi5 सह Xiaomi RedMi Note 2 लॉन्च होणार आहे. लॉन्च होण्यापूर्वी या फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. मात्र, फोन लॉन्च होणार की नाही यासंदर्भात कंपनीने अधिकृत घोषणा अद्याप केेलेली नाही.

Xiaomi ने टीजर फोटो प्रकाशित करून दोन्ही स्मार्टफोन्स लॉन्च करण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे Xiaomi Mi5 सह RedMi Note 2 फोन लॉन्च होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, फ्रेंच वेबसाइट 'Nowhereelse'नुसार दुसरा स्मार्टफोन Xiaomi E5 असेल.

संभाव्य स्पेसिफिकेशन...
> 64 बिट आर्किटेक्चर असलेले स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर
> 5.7 इंचाचा स्क्रीन आणि 2K डिस्प्ले
> 20.7 मेगापिक्सलचा सोनी सेंसर असलेला रियर कॅमेरा
> 2GB रॅम

Iphone सारखा असू शकतो Look...
Xiaomi Mi5 स्मार्टफोनचा लूक Apple Iphone सारखा असण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी चीनी वेबसाइट 'IThome' ने Xiaomi Mi5 चा फोटो पोस्ट केला होता. त्यानुसार Xiaomi Mi5 चा लूक Iphone सारखा दिसत आहे. नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 'एज-टू-एज' डिस्प्ले असेल. तसेच 2014 मधील चर्चित सॅफायर ग्लास डिस्प्ले असेल.
Apple ने Iphone 6 आणि 6+ मध्ये सॅफायर ग्लास डिस्प्ले तयार करण्‍याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात कंपनीला यश मिळाले नाही.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, Xiaomi Mi5 आणि Xiaomi Red Mi Note 2 मधील संभाव्य फीचर्स...