(Redmi 1S)
गैजेट डेस्क - Xiaomi चा लोकप्रिय लो बजेट
स्मार्टफोन Redmi 1S चा चौथा स्टॉक केवळ पाच सेकंदातच आऊट ऑफ स्टॉक झाला. यावेळी कंपनीने Redmi 1S चे 60000 हॅन्डसेट आणले होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व
स्मार्टफोन लॉन्च झाल्याच्या अवघ्या 5.4 सेकंदातच संपले. याबद्दलची माहिती मनु कुमार जैन (Xiaomi चे इंडिया हेड) यांनी ट्वीटरवरून दिली.
यापूर्वी आलेला Redmi 1S चा दुसरा स्टॉक केवळ 4.5 सेकंदातच विक्री झाला होता. तर तीसरा स्टॉकमधील 40,000 स्मार्टफोन केवळ 3.2 सेकंदात विक्री झाले होते. चीनीच्या Xiaomi या प्रसिध्द कंपनीने Redmi 1S ला चांगला रिस्पॉन्स मिळावा या करीता त्यांचा बहूचर्चित फोन Mi3 ची भारतात विक्री थांबवली आहे. चौथ्या स्टॉकमध्ये आलेले 40,000 हॅण्डसेटही काही सेकंदातच विक्री गेले. यावेळी कंपनीने त्यांच्या पुढील स्टॉक कधी येणार या बद्दल कोणतीच तारीख दिलेली नाही.
CounterPoint Research च्या एप्रिल 2014 च्या निकालानुसार, चीनमध्ये Xiaomi RedMi 1S हा बेस्ट सेलिंग स्मार्टफोन आहे.
किती आहे किंमत
फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 5999 रुपयांमध्ये मिळतो. मात्र हा फोन जेव्हा भारतात लॉन्च झाला होता त्यावेळी याची किंमत 6999 रुपये एवढी ठेवण्यात आली होती.
पुढील स्लाईडमध्ये पाहा या स्मार्टफोनचे फीचर्स...