आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Xiaomi Redmi 1s Sold Out Within Seconds From Flipkart

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंपन्यांत स्वस्त मोबाइलची स्पर्धा, ग्राहकांचा फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - स्वस्त स्मार्टफोनच्या जोरावर भारतीय बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्याच्या कंपन्यांच्या काट्याच्या स्पर्धेत ग्राहकांचा मात्र फायदा होत आहे. देशातील कंपन्या तसेच चिनी कंपन्याही वाजवी दरातील स्मार्टफोनच्या माध्यमातून आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मागील पंधरवड्यात अनेक कंपन्यांनी वाजवी दरातील स्मार्टफोन बाजारात आणले आहेत.

ऑनलाइन किरकोळ विक्री करणाऱ्या वेबसाइट्सच्या माध्यमातून या कंपन्यांनी उत्पादने सादर करण्यावर भर दिला आहे.

२००० ते ९००० रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन
मोबाइल हँडसेट िनर्मात्या स्पाइस मोबिलिटी लिमिटेड, इंटेक्स, कार्बन, िशयोमी या कंपन्यांनी एकीकडे स्वस्त दराचे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, तर आॅनलाइन व्यवहार करणाऱ्या िफ्लपकार्टने स्वस्त टॅब्लेट सादर करून बाजारपेठेतील िहस्सा वाढवण्यावर जोर िदला आहे. दरम्यान, स्पाइसने देशात प्रथमच फायरफॉक्स ऑपरेटिंग िसस्टिमवर (ओएस) आधारित स्वस्त स्मार्टफोन स्पाइस फायर वन एमआय एफएक्स सादर केला आहे. याची िकंमत केवळ २२९९ रुपये आहे.१९९० रुपयांत क्लाउड एफएक्स स्मार्टफोन
मागच्याआठवड्यात स्पाइस मोबाइलने फायर वन २२९९ रुपयांत बाजारात आणला. कंपनीने देशातील फीचर फोनचा वापर करणाऱ्या ग्राहकांपर्यंत स्वस्त स्मार्टफोन पोहोचण्यासाठी हा हँडसेट बाजारात आणला आहे. हा फोन एक गीगा हर्ट््झ प्रोसेसर आणि ड्युएल सिमयुक्त आहे. इंटेक्सने स्मार्टफोन क्लाऊड एफएक्स हा हँडसेट केवळ १९९० रुपयांत बाजारात सादर करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

कार्बन टायटेनियम एस-१९
कार्बननेही बाजारपेठेतील आपली दमदार उपस्थिती नोंदवत सेल्फी स्मार्टफोन टायटेनियम एस-१९ सादर केला आहे. यात सोनीचा १३ एमपी िरअर कॅमेरा आणि सेल्फी सुविधा असणारा पाच मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

फ्लिपकार्टचे स्वस्त टॅब
प्रसिद्ध ई-शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टने आपल्या िडजिफ्लिप प्रो ब्रँडअंतर्गत पाच नवे टॅब्लेट सादर केले आहेत. यातील ईटी ७०१ ची िकंमत ५९९९ रुपये आहे. याची स्क्रीन सात इंच असून वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस या सुविधा यात असल्याचे कंपनीने म्हटले आहे.