Redmi 1S
गॅजेट डेस्क - Xiaomi चा नवा स्मार्टफोन Redmi 1S चा स्टॉकसुध्दा Mi3 प्रमाणेच लॉन्च झाल्याच्या केवळ 4.2 सेकंदाच्या आतच संपला. फ्लिपकार्टच्या या पहिल्या फ्लॅश सेलमध्ये Redmi 1S चे 40,000 हॅन्डसेट्स विक्री गेले. हा फोन मंगळवारी दुपारी 2.00 वाजता फ्लिपकार्टद्वारे या फोनची विक्री सुरू करण्यात आली. मात्र लॉन्चींगच्या काही सेकंदातच स्टॉक आऊटऑफ स्टॉक झाला.
नुकतेच Mi3 ला भारतात मिळालेल्या उद्दंड प्रतिसादामुळे चीनी स्मार्टफोन मेकर Xiaomi भारतातील स्मार्टफोन उद्योगातला एक मोठा खेळाडू म्हणून ओळखला जात आहे. एकीकडे मायक्रोमॅक्स लो बजेट स्मार्टफोनसाठी प्रसिध्द असताना भारतात Mi3 सारखा हायरेंज स्मार्टफोन लो बजेटमध्ये सादर करून Xiaomi ने भारतीय बाजारपेठेत आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यातच Xiaomi च्या या नव्या Redmi 1s लाही असाच उद्दंड प्रतिसाद मिळाल्याने भारतीय बाजारात Xiaomi ने आपला एक वेगळा ग्राहक निर्माण केला आहे.
Redmi 1S
किंमत- 5999 रुपये
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, या स्मार्टफोनचे फीचर्स