आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Xiomi ने लॉन्च केला 3G आणि 4G प्रकारातील Redmi Note, किंमत 8999 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Xiaomi Redmi Note)
चीनी स्मार्टफोन मेकर Xiaomi ने कंपनीचा नवा (फॅबलेट) रेडमी नोट भारतात लॉन्च केला आहे. या लॉन्चींग कार्यक्रमात Xiaomi चे ऑपरेशन हेड (इंडिया) मनू जैन आणि व्हाईस प्रेसिडेंट (इंटरनेशनल) ह्यूगो बारा हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान ह्यूगो बारा म्हणाले की, Xiaomi जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या स्मार्टफोन पैकी एक आहे.
कंपनीने या फॅबलेटची किंमत 8999 इतकी ठेवली आहे यासोबतच रेडमी नोटचे 4G व्हेरिएंट 9999 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन फ्लिपकार्ट आणि एअरटेल इंडियामध्ये एक्सक्लूसिव्हली 2 डिसेंबरला उपलब्ध करून दिला जाणार आहे.
काय आहे विशेष
* ऑक्टा-कोर प्रोसेसर
* ग्लॉसी फिनिश बॉडी
* कस्टमाइज यूजर इंटरफेस
* चार खास इंडिया थीम्स
* लॉक स्क्रीन वर चार वेगवेगळे ऑप्शन देण्यात आले आहे, यामध्ये कॅमेरा, डायलपॅड आणि अनलॉकचा समावेश आहे.
* लॉक स्क्रीनवर डबल टॅप केल्याने म्यूझिक प्लेअर उघडते.
* मल्टिपल कॅमेरा ऑप्शनसोबतच यामध्ये 13 मेगापिक्सलचा रेअर कॅमेरा देण्यात आला आहे.
* 1GB आणि 2GB रॅममध्ये उपलब्ध
* HD गेमिंगसाठी चांगले ऑप्शन
* डिटेल वेदर (हवामान) अॅप
* डुअल सिम (WCDMA+GSM) आणि डुअल स्टँडबाय सपोर्ट
* स्विफ्टकी (SwiftKey Keyboard App) सपोर्ट
Xiaomi चे मागील स्मार्टफोन Mi3 आणि रेडमी 1S ला भारतीय मार्केटमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. कंपनीने आतापर्यंत भारतात जेवढेसुध्दा हँडसेट आणले ते सर्वच विकले गेले आहेत. य़ामुळे Xiaomi कंपनीचा तिसरा हँडसेट लॉन्च केला आहे. कंपनीला याकडूनही पहिल्या दोन स्मार्टफोनप्रमाणेच अपेक्षा आहे.

पुढील स्लाईडवर वाचा, Xiaomi रेडमी नोटचे फीचर्स -