आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात Xiaomi स्मार्टफोन्सवर बंदी, मायक्रोमॅक्स, इंटेक्सवरही होऊ शकते कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - भारतीय स्मार्टफोन बाजारात वेगाने लोकप्रिय झालेला चीनी मोबाईल क्झिओमीच्या स्मार्टफोन्सवर दिल्ली हायकोर्टाने बंदी घातली आहे. ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टला हे हँडसेट्स न विकण्यासाठी कोर्टाने सांगितले आहे. एरिक्सन या कंपनीने पेटंट उल्लंघनासंबंधीत तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. एरिक्सनने आपल्या आठ पेटंटचे उल्लंघन केल्याची तक्रार केली आहे. कोर्टने अजून डिटेल ऑर्डर काढले नाही, त्यामुळे क्झिओमीने कोणत्या डिव्हाईसमध्ये पेटंटचे उल्लंघन केले याबद्दल कळू शकले नाही.
काय म्हणाले कोर्ट
कोर्टाच्या आदेशानुसार, एरिक्सन मोबाईल टेक्नॉलॉजीचे पेटंट उल्लंघन करणाऱ्या क्झिओमीचे हँडसेट्स बनवले जाणार नाही, आणि विक्रीही होणार नाही. कस्टम अधिकाऱ्यांनी याच्या आयातीवरही बंदी घातली आहे. एरिक्सनने मांडलेल्या मुद्द्यांवर विचार करत कोर्टाने या मोबाईलवर तात्पूरती बंदी घातली आहे.
मायक्रोमॅक्स, इंटेक्स आणि जिओनीवरही होऊ शकते कारवाई
एका अहवालानुसार, चीनी कंपनी क्झिओमीने यापूर्वी एरिक्सनने पाठवलेल्या 6 रिमाइंडरचे कोणतेच उत्तर दिले नाही. एरिक्सन कंपनीने याप्रकारची पेटंट उल्लंघनची तक्रार मायक्रोमॅक्स, जिओनी आणि इंटेक्सच्या स्मार्टफोनवरही लावली आहे. जर या कंपन्यांनी या संबंधीत काहीच उत्तर दिले नाही तर या कंपन्यांवरही कारवाई होऊ शकेल.

काय म्हणतात कंपनीचे अधिकारी-
क्झिओमीचे भारताचे हेड मनु जैन म्हणाले की, आमच्याकडे सध्यातरी कोणतीच अधिकृत कोर्टाची ऑर्डर आलेली नाही. कंपनी कायद्यानुसार काम करेल आणि एरिक्सनशी बोलून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न करेल