आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Xiaomi Unveils The Affordable Redmi 2, Launching In China On January 9

xiaomi ने लॉन्च केला Redmi2, 4G कनेक्टीव्हीटीसोबतच अनेक आधुनिक फीचर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनची मोबाईल कंपनी क्झिओमीने भारतातील लोकप्रिय स्मार्टफोन Redmi 1 एस चे अपडेटेड व्हर्जन Redmi 2 लॉन्च केला आहे. हा फोन चीनमध्ये 9 जानेवारीला मिळेल. मात्र भारतात या फोनची विक्री कधी सुरू होणार याबद्दल काहीच सांगण्यात आलेले नाही. कंपनीचा असा दावा आहे की, Redmi 1 च्या तुलनेत Redmi 2 अधिक चांगला आहे. यामध्ये Redmi 1 मधील सर्वच त्रुती काढण्यात आल्या आहेत. Redmi 2 ची किंमत 7100 रुपयांपर्यंत असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Redmi 2 मध्ये 4.7 इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली आहे तसेच व्हिडीओ रेकॉर्डिंग 1280p रेझोल्यूशनचे आहे. यामध्ये 410 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आले आहे. Redmi च्या मागील मॉडेलमध्ये 4.7 इंचाचे 720p HD IPS डिस्प्ले होते तसेच त्यामध्ये स्नॅपड्रॅगन 400 क्वाडकोर प्रोसेसर देण्यात आले होते. Redmi 2 ची बॅटरीक्षमताही वाढवण्यात आली आहे. या फोनमध्ये 2200 एमएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी Redmi 1 मध्ये केवळ 2000 एमएच एवढी होती. Redmi 1 एमआययूआय 5 वर चालतो, तर Redmi 2 एमआययूआय 6 वर चालेल. Redmi 2 मध्ये 4जी कनेक्टविटीसुध्दा देण्यात आली आहे.जे की यापूर्वीच्या मॉडेलमध्ये केवळ 3जी आणि टूजीचीच सुविधा होती. Redmi 2 हा स्मार्टफोन पाच वेगवेगळ्या रंगांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, Redmi 2 चे इतर फीचर्स