आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

13 MP कॅमेरा 2 GB रॅम आणि अँड्रॉईड किटकॅटसुध्दा; XOLO चा नवा स्मार्टफोन लॉन्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(Play 8X-1100)
गॅजेट डेस्क - भारतीय स्मार्टफोन मेकर XOLO कंपनीने नुकतेच त्यांच्या लोकप्रिय सिरिजचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. XOLO च्या प्ले सीरीज विशेष करून गेम लव्हर्स आणि फोटोग्राफीचे क्रेझ असणार्‍या लोकांना आवडतो. XOLO च्या या नव्या डिव्हाईसची किंमत 14999 रुपये ठेवण्यात आली आहे. XOLO प्ले सीरीजमध्ये 6X-1000, प्ले 8X-1200 आणि प्ले 8X-1100 यांचाही समावेश झाला आहे.
किंमतीकडे पाहता कंपनीने या स्मार्टफोनमध्ये चांगल्यात चांगले फीचर्स देण्याचा प्रयत्न केला आहे. या फोनचे विषेश म्हणजे या मोबाईलमध्ये लावण्यात आलेला ऑक्टाकोर प्रोसेसर. ज्यामुळे गेमर्सला चांगला स्पीड मिळतो.
काय आहे ऑक्टा-कोर प्रोसेसर -

प्रोसेसरमधये कोर सेपरेट प्रोसेसिंग युनिट असते. हे युनिटचा वापर विशेषकरून मल्टीटास्कींग आणि स्पीडकरता होतो. सिंगल कोर प्रोसेसरच्या तुलनेत मल्टीकोर प्रोसेसर वेगाने काम करते आणि मल्टी टास्कींगसाठी हे उपयुक्त आहे. ऑक्टा-कोर प्रोसेसर सिंगल कोरच्या तुलनेत 8 पटीने वेगात काम करते.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, या फोनचे प्रोसेसर-