आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

याहूने आणले अँक्सिस सर्च

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

याहूने आता आपले नवे ब्राउझर अँक्सिस आणले आहे. ते थंबनेल फॉरमॅटमध्ये छायाचित्रमय सर्च रिझल्ट सादर करेल. अँक्सिसबाबत अधिक जाणून घेऊया.

गुगल सर्च इंजिनच्या वाढत्या लोकप्रियतेला आव्हान देण्यासाठी याहूने आपले नवे सर्च ब्राउझर अँक्सिस सुरू केले आहे. त्याच्या साहाय्याने इंटरनेटवर सर्चिंगचा अनुभवच बदलून जाईल. त्याद्वारे याहू इंटरनेट उपयोगकर्त्यांना सुलभ सर्च ऑप्शन देण्याचा दावा करत आहे.

फोटोमय सर्च रिझल्ट : याहूचे अँक्सिस सर्च खरे तर एचटीएमएल 5 केंद्रित ब्राउझर अँप आहे, जे सर्च रिझल्ट्स वेब लिंक्सऐवजी छायाचित्रांच्या स्वरूपात सादर करते. त्यामुळे त्याचा थेट सामना उपयोगकर्त्यांना आधीच आवडणार्‍या गुगल आणि मायक्रोसॉफ्ट बिंगशी होईल, हे स्पष्ट आहे. अशावेळी याहूचे हे पाऊल केवळ वेगवान व सोपेच मानले जात नसून, त्याचे परिणामही व्हिज्युअल डिटेल्स घेऊन सांगितले जात आहेत.

काय होईल फायदा? : सध्या आपण गुगल वा दुसर्‍या कोणत्याही वेब ब्राउझरमध्ये सर्च करतो, तेव्हा रिझल्ट्स वेब लिंक्समध्येच मिळतात. त्यामुळे त्या उघडून पाहण्यात आणि योग्य संकेतस्थळापर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. अँक्सिस छायाचित्रमय रिझल्ट देऊन इच्छित संकेतस्थळापर्यंत लवकर पोहोचवते.

कशावर चालेल? : याहूने सध्या तरी हे ब्राउझर अँपलच्या आयफोन, आयपॅड व आयपॉड टचसाठी तयार केले आहे. इतर ऑपरेटिंग सिस्टिम्ससाठी ते तयार केले जात आहे. ते प्लग-इन स्वरूपातही उपलब्ध आहे, जे तुम्ही तुमच्या संगणक वा लॅपटॉपवर इन्स्टॉल करू शकता.

कुठे मिळेल? : हे ब्राउझर अँप अँपलच्या अँप स्टोअरमधून मिळवता येईल.