आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Yamaha Plans To Launch World's Cheapest Motorcycle Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यामाहा आणणार 27,500 रुपये किमतीची स्वस्त बाइक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो दाखल झाल्यानंतर आता जगातील सर्वात स्वस्त बाइक देशाच्या रस्त्यांवर लवकरच धावणार आहे. यामाहा इंडियाने ही बाइक आणण्याची जोरदार तयारी चालवली आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील जपानच्या या दिग्गज कंपनीने अद्याप या बाइकचे नाव ठरवलेले नाही. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बाइकची किंमत 27,500 रुपयांपर्यंत राहील.
ही स्वस्त बाइक सर्वप्रथम भारत आणि आफ्रिकेच्या बाजारपेठांत उतरवण्याची यामाहाची योजना आहे. सध्या या मोटारसायकल निर्मिती प्रकल्पाचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. केवळ 27,500 रुपये किमतीच्या या मोटारसायकलमुळे देशात हीरो मोटोकॉर्पसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. हीरोची सीडी डॉन ही बाइक सध्या देशातील सर्वात स्वस्त बाइक आहे. सीडी डॉनची किंमत 36,000 रुपये आहे, तर यामाहाची क्रक्स ही 110 सीसीची बाइक भारतीय बाजारात 38365 रुपयांत उपलब्ध आहे. नव्या स्वस्त मोटारसायकलला भारतात चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा यामाहाला आहे. यामाहा मोटर्स इंडियाचे सीईओ हीरोयुकी सुझुकी यांच्या मते, भारतीय बाजारात कमी किमतीच्या मोटारसायकलींना प्रचंड मागणी आहे. हे लक्षात घेऊनच कंपनीने भारतीय बाजारात अशा मोटारसायकल आणण्याची योजना आखली आहे. सध्या भारतात कॉम्प्युटर बाइक श्रेणीत यामाहाच्या वायबीआर 110 आणि क्रक्स या बाइक्स उपलब्ध आहेत.
विशेष म्हणजे, अलीकडेच काही कंपन्यांनी स्वस्त बाइक बाजारात आणल्या आहेत, तर काही कंपन्या अशा स्वरूपाच्या प्रकल्पांवर काम करताहेत. होंडाची ड्रीम युगा, बजाजची नवी डिस्कव्हर आणि सुझुकीची हयाते या स्वस्त मिळणा-या काही मोटारसायकली आहेत.
हिरोला टक्कर देण्यासाठी होंडाने आणली \'सीबी यूनीकार्न डेजलर\' बाईक
केटीएम-बजाजची २०० सीसी बाईक येणार