आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षाची अखेर निर्देशांक बाजारात तेजी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डेरिव्हेटिव्ह सौदापूर्तीचा अखेरचा दिवस आणि आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, लार्सन अँड टुब्रो, आयटीसी व ओएनजीसी या समभागांवर पडलेल्या गुंतवणूकदारांच्या उड्या यामुळे आर्थिक वर्षाची अखेर तेजीने झाली. गुरुवारी शेअर बाजारातील सत्राची सुरुवात स्थिर पातळीवर झाली. मात्र, दुपारच्या सत्रात धातू, भांडवली वस्तू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि सार्वजनिक उद्योगांच्या शेअर्सची मोठी खरेदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स 131.24 अंकांनी वाढून 18,835.77 या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा आठवड्याचा उच्चांक आहे. निफ्टी निर्देशांक 40.95 अंकांनी वाढून 5,682.55 या स्तरावर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील दुस-या रांगेतील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार खरेदीने तेजीला बळ मिळाले.


निफ्टीकडे लक्ष
आगामी आठवड्यात निफ्टी 5700 या पातळीवर स्थिरावला, तर रिकव्हरी शक्य आहे. अल्प कालावधीचा विचार केल्यास 5700 ही निफ्टीसाठी महत्त्वाची पातळी ठरणार आहे. या पातळीवर आणखी खरेदीचा कल दिसण्याची शक्यता आहे.’’
राकेश गोयल, वरिष्ठ उपाध्यक्ष, बोनान्झा पोर्टफोलिओ.