आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • You Can Get Your Passport In Just 10 Days By These Ways

आता अवघ्या 10 दिवसांत घरी येईल तुमचा PASSPORT; वाचा, सात सिम्पल STEPS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करणार्‍या अर्जदारांसाठी खुशखबर आहे. आता पासपोर्ट अवघ्या 10 दिवसांत अर्जदाराच्या घरी पासपोर्ट येईल. मात्र, यासाठी अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे अर्जदाराची या प्रक्रियेत कागदपत्रांसाठी (डॉक्युमेंट्स) धावपळीही होत नाही.
ओळख पत्र (आयडी प्रूफ) आणि घराचा पत्ता (अॅड्रेस प्रूफ) या सारखे डॉक्युमेंट ऐवजी फक्त एका आधारकार्डवरही काम होते. मात्र, त्यासाठी अर्जदाराकडे आधारकार्ड असणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज करतेवेळी अर्जदाराला पुढील तीन दिवसांत अपॉईन्टमेंट मिळते. सात दिवसांत अर्जावर कार्यवाही होते आणि 10 व्या दिवशी पासपोर्ट अर्जदाराच्या हातात मिळतो.
यापूर्वीची प्रक्रिया खूप वेळ खाऊ होती. आता मात्र, पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन पद्धत अवलंबण्यात आल्याने अर्जदाराच्या वेळेत खूप बचत होणार असल्याचे, गाझियाबादचे पासपोर्ट अधिकारी सीताराम यादव यांनी सांगितले आहे.

दरम्यान, यापूर्वी पासपोर्ट बनवण्यासाठी पोलिस चौकशी आवश्यक होती. मात्र, ही प्रक्रिया फारच गुंतागुंतीची होती. तसेच अनेक तक्रारीत समोर आल्या होत्या. त्यामुळे पासपोर्ट बनविण्यात खूप वेळ खर्च होत होता. अर्जदाराची डोकेदुखी कमी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, पासपोर्ट बनवण्यासाठी कसा करावा ऑनलाइन अर्ज...

(टीप: छायाचित्रे सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.)