आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण गुंतवणूकदारांत ‘ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग’ची ‘क्रेझ’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गॅजेट्स, तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजार विश्लेषकांकडून मिळणारी माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे गेल्या दोन वर्षात तरुण गुंतवणूकदारांमध्ये ऑनलाइन ट्रेडिंगची क्रेझ वाढत आहे. अतिरिक्त कमाई करण्याचे एक साधन म्हणून यंगिस्तानमधील समभाग व्यवहार ऑनलाइन करण्याचे प्रमाण लक्षणीय 72 टक्क्यांनी वाढले असल्याचे असोचेमने केलेल्या एका पाहणीत दिसून आले आहे.

असोचेमच्या ‘सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन’ या विभागाने जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीत केलेल्या या सर्वेक्षणात ऑनलाइन शेअर ट्रेडिंग उद्योगात वार्षिक आधारावर 150 टक्क्यांनी वाढ होत असून गेल्या दोन वर्षात इंटरनेटवरून होणा-या सर्व व्यवहारांच्या मूल्यात दहापटीपेक्षा जास्त वाढ झाली असल्याचे
दिसून आले आहे.

असोचेमने अडीच हजार तरुण गुंतवणूकदारांचा अभ्यास करून हा सर्वेक्षण अहवाल तयार केला असून त्यामध्ये 62 टक्के पुरुष आणि 38 टक्के महिलांचा समावेश होता. ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमध्ये दिल्ली अव्वल क्रमांकावर असून त्यापाठोपाठ मुंबई, बंगळुरू, चंदिगड, कोलकाता, अहमदाबाद आणि डेहराडून या शहरांचा क्रमांक लागतो
प्रत्येक तरुणाला आपल्या उत्पन्नात वाढ करायची असून ऑनलाइन ट्रेडिंग हा सर्वात नफादायी व्यवसाय आहे. त्यासाठी तुम्हाला ट्रेडिंग कसे करायचे याचे ज्ञान असावे लागते. त्यामुळे प्रत्येक तरुणासाठी स्टॉक ट्रेडिंग हे नव्या पिढीतील आकर्षण ठरले असल्याचे मत या सर्वेक्षणातील बहुसंख्य तरुण गुंतवणूकदारांनी व्यक्त केले आहे.

शेअर ट्रेडिंगची भुरळ- व्यावसायिक असो अव्यावसायिक, नोकरदार असो की बेरोजगार बहुतांश हुशार आणि उत्साही तरुणाईला ऑनलाइन शेअर ट्रेडिंगची भुरळ पडली आहे.- डी.एस. रावत, महासचिव, असोचॅम

अहवालातील निष्कर्ष- इंटरनेट ट्रेडिंग करणारा वयोगट : 18 ते 23 वर्षे, 24 ते 29 वर्षे, 30 ते 35 वर्षे.
केवळ आठ टक्के ऑनलाइन ट्रेंडिंग करणारा वयोगट : 36 ते 41 वर्षे आणि 42 वर्षावरील
फ्युचर अ‍ॅँड ऑप्शनमधील व्यवहाराला सर्वाधिक पसंती देणा-या तरुणाईचे प्रमाण : 64 %