आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • YouTube Launches First Daily Show To Help Users Find Best Videos

YouTube वर पहिली वेब सिरीअल, युजर्सना सर्वोत्तम व्हिडीओ शोधण्यात होईल मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

YouTube ने युटूब नेशन नावाची एक वेब सिरीअल सुरू केली आहे. युटूबवरील सर्वोत्तम व्हिडीओ शोधण्यात युजर्सना या सिरिअलचा उपयोग होणार आहे.

ही सिरीअल आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार रोज रात्री 9 वाजता प्रसारित केली जाईल. या सिरीअलचा होस्ट (अ‍ॅंकर) जाकोब सोबोरोफ असेल. ही सिरीअल हॉटस्पॉट लाइव आणि ड्रीमवर्कस नेटवर्क यांच्या वतीने सादर केली जाणार आहे.

या सिरीअलच्या पहिल्याच भागात ग्रॅंन्लॉन्ड येथील फुटबॉल सिरीजपासून स्कायडाइवींगच्या पहिला जागतिक विक्रमपर्यंत अनेक गोष्टी दाखवण्यात येतील, असे व्हर्ग यांनी सांगितले आहे.

युटूब नेशन ही सिरीअल युजर्सना बेस्ट व्हिडीओ शोधण्यासाठीही मदत करेल. याचबरोबर यूटूबच्या ब्रँडिंगसाठीही ही सिरीअल असेल, असे युटूबचे केवीन आलोका यांनी सांगितले आहे.