आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुंतवणूकदार संतापले : फेसबुकचा मालक झुकेरबर्गवर आणखी एक गुन्हा दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फेसबुकच्या गुंतवणूकदारांनी सोशल नेटवर्किंग साइट कंपनीचा सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल केला आहे. संतापलेल्या गुंतवणूकदारांनी आरोप केला आहे की, झुकेरबर्गला हे माहित होते की, कंपनीची स्टॉक किंमत वाढवून सांगितली जात आहे. त्यामुळे आयपीओ खुला होताच फेसबुकची शेअर किंमत झपाट्याने घसरल्या आहेत.
झुकेरबर्गने अशी स्थिती तयार होण्याआधी १.१ अब्ज डॉलरचे शेअर विकले आहेत. गुंतवणूकदारांनी यावरुन झुकेरबर्गला कोर्टात खेचले आहे. याचिकेत म्हटले आहे की, बॅंकांना याची माहिती होती की, फेसबुकच्या महसूलात मोठी घट झाल्याने त्याचा आयपीओवर परिणाम होईल. झुकेरबर्गने ही बाब मोठ्या गुंतवणूकदारांना सांगितली मात्र सामान्या गुंतवणूकदारांपासून त्याने ही बाब लपवून ठेवली.
फेसबुकसारख्या इंटरनेट कंपनीचा ३८ डॉलर्सला एक शेअर विकणे हे इतर बिझनेस मॉडेलप्रमाणे शक्य नसल्याची कल्पना झुकेरबर्गने स र्व गुंतवणूकदारांना द्यायला हवी होती. मात्र ती दिली नाही. तसेच फेसबुकचा आयपीओ बाजारात आणण्याबाबत सल्लागार कंपन्या मॉर्गन स्टेनली, जेपी मॉर्गन आणि गोल्डमॅन सैश यांनाही सहआरोपी बनविले आहे.
दोन आठवड्याच्या आतच झुकेरबर्गवर दुसरी याचिका दाखल झाली आहे. त्यात म्हटले आहे की, आयपीओ बाजारात येण्यापूर्वीच एक दिवस आपल्याजवळील शेअर्स विकणे हे स्पष्ट करते की, कंपनीच्या सीईओला याबाबत आधीच माहिती होती.
फेसबुकच्या शेअर किंमतीत पंधरा दिवसातच ३० टक्क्यांनी घट झाली आहे. फेसबुकच्या एका शेअरची किंमत ३८ डॉलरवरुन २७ डॉलरवर आली आहे.
फेसबुकचा आयपीओ आणि मार्क झुकेरबर्गसमोरील आव्‍हाने
जाहिरातीच्‍या मैदानावर फेसबुक झाले क्लिन बोल्‍ड?
फक्त पुढील पाच वर्षे चालेल गुगल, फेसबुक ?