आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Zuckerberg Out Of Richest Tech Billionaire List As Facebook Shares Slide ‎

टॉप - 10 श्रीमंतांच्या यादीतून झुकेरबर्ग बाहेर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - फेसबुकच्या घटत्या शेअर्समुळे कंपनीचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडावे लागले आहे. एका आठवड्यात त्यांची संपत्ती 420 दशलक्ष डॉलरनी घसरली. त्याचा फटका झुकेरबर्ग यांना बसला असून गेल्या आठवड्यात फेसबुकच्या शेअर्सच्या किमतीत सातत्याने घट नोंदवली गेली. आता त्यांची संपत्ती 10.2 अब्ज डॉलर इतकी राहिली आहे.
फेसबुकच्या एका शेअरची किमत केवळ 20 डॉलर इतकी आहे. फेसबुकचा आयपीओ बाजारात आला होता त्यावेळी त्याची किमत 38 डॉलर होती. नंतर फेसबुकच्या शेअरच्या किमतीत 47 टक्क्यांची घट झाली. झुकेरबर्ग यांचे भवितव्य कंपनीच्या शेअरच्या मूल्यांवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे 503.6 दशलक्ष शेअर्सचा अधिकार आहे. याशिवाय त्यांच्याकडे 150 दशलक्ष डॉलर रोखदेखील आहे.
बिल गेट्स पहिल्या स्थानी : जगातील टॉप -10 टेक्नोक्रॅट श्रीमंतांच्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.6 अब्ज डॉलर आहे.