आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोफियाच्या प्रेमात अडकला रोहित शर्मा ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - क्रिकेटर रोहित शर्मा मॉडेल सोफिया हयातच्या प्रेमामध्ये अडकला आहे असे स्पष्ट दिसत आहे. हा फोटो पाहून असेच वाटत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित आणि सोफिया काही दिवसांपासून एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. या दोघांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहण्यात आले आहे. मित्रांबरोबर आउटिंगसाठी गेलेले हे दोघे एकत्र दिसले. रोहित आणि सोफियाला थोड्या दिवसापूर्वी जुहूच्या एका हॉटेलमध्ये सोबत कॉफी पिताना पाहिले गेले आहे. हे दोघेही पाच तास एकत्र त्या हॉटेलमध्ये होते.
रोहित आणि सोफिया त्यांच्या या नात्याबद्दल काहीच बोलण्यास तयार नसले तरी, सोफियाच्या जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की, या दोघांची जुनी ओळख आहे. दोघेही चांगले मित्र आहेत. या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल स्वतःच सांगणे योग्य राहील.
श्रीलंका दौ-यात रोहित विशेष काही कामगिरी करू शकला नाही त्यामुळे त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. सोफियाकडेही सध्या काही काम नाहीये, त्यामुळे हे दोघे एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.