आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Yummy Ice Cream स्‍वत: बनवा आणि इतरांना खाऊ घाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बटर स्‍कॉच आइसक्रीम तयार करण्‍याचे साहित्‍य-
साखर पावडर- 1/4 कप.
क्रीम दूध- 500 मिली.
दूध पावडर- 1/4 कप.
बरट स्‍कॉच एसेन्‍स- 1/2 चमचा.

क्रन्‍च करण्‍यासाठी- अर्धा कप काजू पावडर, 100 ग्रॅम साखर पावडर.
क्रन्‍च तयार करण्‍याची पद्धत-
छोट्या पातेल्‍यामध्‍ये साखर हालकी गरम करा. साखरेचा पाक तयार झाल्‍यानंतर बाजूला काढून घ्‍या. नंतर काजू पावडर टाका व मिक्स करून घ्‍या. हे मिश्रण पात्रामध्‍ये काढून थंड करून घ्‍या. मिश्रण सुकल्‍यानंतर याचे छोटे-छोटे तुकडे करा.
आइसक्रीम तयार करण्‍याची पद्धत-
क्रीम, दूध, साखर आणि इतर साहित्‍य एकत्र करा. मात्र आत्ताच यामध्‍ये बटर स्‍कॉच टाकू नका. मंद अचेवर हे मिश्रण गरम करा. हे मिश्रण 'घट्ट' झाल्‍यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्‍यांनतर या मिश्रणात बटर स्‍कॉच टाकून परत एकदा मिक्‍स करा. मिश्रण थंड होण्‍यासाठी फ्रिजमध्‍ये ठेवा. थंड झाल्‍यानंतर हे मिश्रण परत एकदा मिक्‍सरमधून काढून घ्‍या. नंतर परत एकदा फ्रिजमध्‍ये ठेवा. आता आइसक्रीम तयार झाल्‍यानंतर काजुचे तुकडे आइसक्रीमवर लावा.