आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलेक्सिसने बाविशीत सुरू केली होती रेडिट कंपनी, सेरेनाशी साखरपुडा झाल्याने सध्या चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एलेक्सिस आेहानिअन तंत्रज्ञान उद्योजक आणि बेस्ट सेलिंग लेखक आहेत. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात १९८३ मध्ये त्यांचा जन्म झाला. सध्या एलेक्सिस चर्चेत आहेत. टेनिस स्टार सेरेना विल्यम्स आणि एलेक्सिस विवाह करणार आहेत. एलेक्सिस यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची उंची. त्यांची उंची ६ फूट ५ इंच आहे. सेरेना विल्यम्सची उंची ५ फूट ९ इंच आहे.  
एलेक्सिसचे वडील अर्मेनियन अमेरिकन आहेत, तर आई जर्मन आहे. व्हर्जिनिया विद्यापीठातून २००५ मध्ये त्यांनी वाणिज्य आणि इतिहासात पदवी घेतली. एलेक्सिस यांचे शालेय शिक्षण मेरीलँडच्या एलिकॉट सिटीमध्ये झाले. पदवी घेताच त्यांनी सोशल न्यूज वेबसाइट रेडिटची निर्मिती केली. यात त्यांचे पार्टनर होते स्टीव्ह हफमॅन. हफमॅन त्यांचे पदवी शिक्षणापासूनचे मित्र. रेडिटची निर्मिती केली तेव्हा एलिक्ससचे वय केवळ २२ वर्षे होते. त्यानंतर ते सातत्याने नवनवे प्रयोग करत राहिले. २००७ मध्ये त्यांनी सोशल एंटरप्राइज साइट ब्रेडपिग तयार केली. २०१० मध्ये ट्रॅव्हल सर्च वेबसाइट हिपमंकची निर्मिती केली. त्यांनी व्हेंचर कॅपिटल फर्म इनिशियलाइज्ड कॅपिटलचीदेखील स्थापना केली. २०१३ मध्ये एलेक्सिस यांनी एक पुस्तक लिहिले. त्याचे नाव होते ‘विदाऊट देअर पर्मिशन : हाऊ द २१ सेंच्युरी विल बी मेड, नॉट मॅनेज्ड’. याशिवाय ते राजकीय क्षेत्रातही सक्रिय आहेत. ऑनलाइन कॉपीराइट उल्लंघनप्रकरणी प्रस्तावित विधेयकावर त्यांची लोकप्रतिनिधींशी दीर्घ चर्चा झाली. त्यानंतर त्यांना ‘मेयर ऑफ द इंटरनेट’  म्हणण्यात येऊ लागले. २००६ मध्ये एलेक्सिस आणि हफमॅन यांनी रेडिट काँड नेस्ट विकली. कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य म्हणून ते यासाठी काम करत राहिले. २०१५ मध्ये त्यांनी पूर्णत: स्वतंत्र रेडिटमध्ये सीईआे म्हणून पुनरागमन केले. त्यांनी २०० पेक्षा अधिक टेक स्टार्टअप्सचे सल्लागार म्हणून काम केले.  

रेडिट सुरू करण्यामागे एक किस्सा आहे. २००३ मध्ये एलेक्सिस वाणिज्य आणि इतिहासाच्या पदवी शिक्षणासाठी लंडनमध्ये होते. एका रविवारी त्यांच्याकडे काहीच काम नव्हते. ते हाइड पार्क येथे आले. स्पीकर्स कॉर्नरला दिवसभर वक्त्यांची भाषणे एेकली. या जागी कोणीही आपली भूमिका मांडू शकते. भाषण करू शकते. त्याला कोणी श्रोते असोत वा नसोत. येथे लोकांची गर्दी नेहमीच असते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की तेथील लोकांमध्ये काही उत्साही होते. काही उत्सुकतेपोटी आले होते. लोक एकत्र येऊन वादविवाद घालत. माझ्यासाठी हा नवा अनुभव ठरला. मला वाटले याला अधिक सहज करता येईल. सर्वांना आपली भूमिका मांडता आली पाहिजे.  

महाविद्यालयात असताना एलेक्सिस आणि हफमॅन, पॉल ग्रॅहमचे लेक्चर ऐकण्यासाठी केंब्रिजला गेले होते. ‘हाऊ टू स्टार्ट अ स्टार्टअप’ असा त्याचा विषय होता. त्यांनी ग्रॅहमची भेट घेतली. त्यांच्यासमोर स्टार्टअपच्या काही कल्पना सांगितल्या. काही कल्पना ग्रॅहमला पटल्या नव्हत्या. 

 त्यांनी रेडिट डॉट कॉमची कल्पना सांगितली. रेडिट सोशल न्यूज वेबसाइट आहे. यात वाचक पहिल्या पानाला नियंत्रित करू शकतात. त्यांना जी बातमी पहिल्या पानावर हवी असेल त्यासाठी मत देता येते. हे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर काही महिने एलेक्सिस आणि हफमॅनच यावर येणारा मजकूर पोस्ट करत होते.  
 
वेबसाइट सुरू झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत एलेक्सिस आणि पार्टनर हफमॅन येणारा निम्म्यापेक्षा अधिक मजकूर पोस्ट करत होते.  ऑनलाइन कॉपीराइट उल्लंघनप्रकरणी प्रस्तावित विधेयकावर लोकप्रतिनिधींशी त्यांची दीर्घ चर्चा झाली. त्यांना ‘मेयर ऑफ द इंटरनेट’ असे म्हटले गेले.
बातम्या आणखी आहेत...