आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्नोत्तरांचे असे आश्चर्यकारक जग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रश्नोत्तरांचे जग अनंत आहे. अमेरिकन नियतकालिक टाइमने आपल्या वार्षिक अंकात प्रश्नोत्तरांच्या वैशिष्ट्यपूर्ण जगात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक प्रश्न आणि त्यांची उत्तरे आपल्याला आश्चर्यचकित करतील. यापैकी काही प्रश्नांवर नजर टाकूयात... कोंबडी पहिले की अंडे? अंतराळात गंध कसा येतो? माणसाचा गर्भ श्वासोच्छ‌्वास कसा करतो? आपण हसतो का? हे संशोधन आपल्याला नवीन कल दाखवते. इतिहासाची पाने उलटण्याची संधी देते. विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण, मनोरंजनासह मानवी जीवनाशी निगडित अनेक क्षेत्रांबाबतची माहिती आपल्याला माहितीचा खजिना उपलब्ध करून देते.

मानवनिर्मित शोधांचा इतिहास!
1 जवळपास ६० लाख वर्षांपूर्वी पहिल्यांदा मानवाने दोन्ही पायांवर उभे राहून चालायला सुरुवात केली. इथिअोपियामध्ये २६ लाख वर्षांपूर्वी दगडी हत्यारांचा शोध लागला. १९ लाख वर्षांपूर्वी मानवाने आगीचा शोध लावला. १७ हजार वर्षांपूर्वी रंगाचा वापर करण्यात आला. पहिली दिनदर्शिका १० हजार वर्षांपूर्वी बनवण्यात आली. ९५०० वर्षांपूर्वी लोकांनी मांजर पाळायला सुरुवात केली.
2 चीनमध्ये ९ हजार वर्षांपूर्वी पहिल्यांदा मद्य बनवण्यात आले. ४२०० वर्षांपूर्वी साबणाचा शोध लागला. ग्रीसमध्ये पहिले नाटक २५३४ वर्षांपूर्वी सादर करण्यात आले.

3 श्रीलंकेमध्ये २४३१ वर्षांपूर्वी पहिले रुग्णालय बनवले. टॉयलेट पेपरचा शोध २८५१ वर्षांपूर्वी लागला. पहिल्या विश्वविद्यालयाची मोरक्कोमध्ये २८५१ वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली. नवव्या शतकात चीनमध्ये गनपावडरचा शोध लागला. नवव्या दशकात माणसाला कॉफीचे गुण समजले.

4 सन १२८५ मध्ये एका इटालियनने चष्म्याचा शोध लावला. १४४० मध्ये गुटेनबर्गने प्रिंटिंग प्रेस सुरू केली होती. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे कोपर्निकसने १५१४ मध्ये सांगितले. १८व्या शतकापासून विद्यार्थ्यांची संख्या वाढायला सुरुवात झाली.

5 बेंजामिन फ्रँकलिनने १७५२ मध्ये विजेच्या शॉक देण्याच्या क्षमतेचा शोध लावला. जॉन माँटेग्यूने १७६२ मध्ये पहिल्यांदा सँडविच बनवले.

6 एका फ्रान्सिस व्यक्तीने १८६२ मध्ये पहिले छायाचित्र काढले. १८३५ मध्ये रिव्हाॅल्व्हरचा शोध लागला. पहिली इलेक्ट्रिक कार १८३७, पहिले फॅक्स मशीन १८४२ मध्ये बनवण्यात आले.

7 १९२० मध्ये नेल पॉलिशचा शोध लागला. टीव्हीचा शोध १९२५ मध्ये लागला. पहिली लाय डिटेक्टर चाचणी १९२१ मध्ये करण्यात आली.

8 डिजिटल कॉम्प्युटरचा शोध १९४५ मध्ये लागला. आधुनिक बिकिनी फ्रान्समध्ये १९४६ मध्ये समोर आली. जोनास साल्कने १९५२ मध्ये पोलिओ लसीचा शोध लावला. १९६७ मध्ये पहिले हार्ट ट्रान्सप्लांट झाले.

9 १९६९ मध्ये मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले. १९८० मध्ये इंटरनेटचा शोध लागला. जपानमध्ये १९९९ मध्ये इमोजीचा शोध लागला. मार्क झुकेरबर्गने २००४ मध्ये फेसबुक सुरू केले.
बातम्या आणखी आहेत...