आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज 1 तास धावल्यास 3 वर्षे आयुष्य वाढते, हृदयविकाराच्या धोक्यात घट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - दररोज 1 तास धावण्याचा व्यायाम केल्यास आयुष्य 7 तास ते 3 वर्षांपर्यंत वाढू शकते. १८ ते १०० वर्षे वयोगटाच्या ५५ हजार लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास संशोधकांनी केला. ही निरीक्षणे संशोधकांनी १५ वर्षे नोंदवली.
 
तुम्ही वेगाने धावता की धिम्या गतीने हे महत्त्वाचे नाही. एका आठवड्यात किमान तास धावण्याचा व्यायाम झाला पाहिजे. इतर कोणत्याही व्यायामाच्या तुलनेत धावणे हा व्यायाम उत्तम दर्जाचा आहे. दररोज तास धावल्यास अकाली मृत्यूच्या शक्यता ४० % पर्यंत कमी होतात. आहाराचे नियोजन आणि धूम्रपान सोडल्यासदेखील अकाली निधनाच्या शक्यता घटतात. मात्र, धावण्याच्या व्यायामाइतके त्याचे प्रमाण नाही. अमेरिकेच्या आयोवा स्टेट विद्यापीठाचे प्रो. डक-चुल ली यांनी सांगितले की, अध्ययनादरम्यान इतर व्यायाम करणाऱ्यांची माहिती घेण्यात आली.

मात्र, धावणाऱ्यांचे आयुर्मान अधिक दिसून येते. त्यांचा मृत्युदर धावत नसलेल्यांच्या तुलनेत १६% कमी आहे. या लोकांमध्ये प्रतिकार क्षमता वाढते. त्यांचा रक्तदाब सामान्य राहतो. स्थूलतेवर नियंत्रण राहते. तणाव आणि असामान्य रक्तदाबामुळे होणारे मृत्यू यांचे प्रमाण अधिक आहे. इतर लोकांच्या तुलनेत धावणाऱ्यांना हृदयविकाराच्या शक्यता २५ % कमी असतात. अॅरोबिक फिटनेस वाढतो. दीर्घकाळ चांगल्या आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
चालणे, सायकलिंग आणि इतर काही व्यायामदेखील आयुर्मानवाढीस कारणीभूत ठरतात असे संशोधकांनी सांगितले. चालणे आणि सायकलिंगमुळे अकाली मृत्यूच्या शक्यता १२% ने घटतात. चांगला लाभ मिळण्यासाठी आहार सवयी, धूम्रपान, मद्यपानावरही नियंत्रण ठेवावे, असे संशोधक सांगतात.
 
अकाली मृत्यूची शक्यता ४०% घटते
आहारावरनियंत्रण ठेवत आणि धूम्रपान सोडल्याने जीवनाची गुणवत्ता वाढते. मात्र, धावण्याच्या तुलनेत हे प्रमाण खूप कमी आहे. नित्याने तास धावणाऱ्यांच्या अकाली मृत्यूच्या शक्यता ४० % कमी होतात.
बातम्या आणखी आहेत...