आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Death Anniv - \'जीवन इथे आणि आता आहे\', वाचा OSHO च्या दहा आज्ञा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओशोंची शिकवण एखाद्या कॉलेजात, शैक्षणिक संस्थेत मिळणाऱ्या शिक्षणासारखी बंदीस्त नाही. ती मंत्रमुग्ध करणाऱ्या मनाला चौफेर फिरवणाऱ्या अशा त्यांच्या व्याख्यानांमध्ये प्रवचनांमध्ये आहे. या व्याख्यानांमध्ये अनेक विनोद, अनेक जुन्या घटनांचा आढावा, बोधकथा अशा सर्वच गोष्टींवर भर दिलेला असतो. विरोधाभास, विसंगतींमध्ये रमणाऱ्या ओशोंचा उपदेश त्यामुळेच समजायला खुपच अवघड जातो. बुध्दत्व पावलेल्या व्यक्तींच्या पारंपरिक वर्तनापेक्षा ओशोंचे वर्तन अतिशय वेगळे होते.ओशोंची सुरूवातीची व्याख्याने तर विनोदासाठीच लोकप्रिय झाली. त्यांचे हे वर्तन मग ते लहरी आणि पचण्यास अवघड असले तरी लोकांना मनापलीकडे नेऊन रुपांतरित करण्यासाठीचे एक तंत्र समजले गेले.
ओशोंनी त्यांच्या प्रवचनातून सर्वच जाती धर्मांच्या आध्यात्मिक परंपरांवर भाष्य केले. अनेक पवित्र ग्रंथ, धर्मग्रंथ, उपनिषद, रहस्यकथा अशा सर्वांवरील टीका टिप्पणी त्यांच्या प्रवचनांमधून दिसून यायची. लुईस कार्टर या समाजशास्त्रज्ञाच्या म्हणण्यानुसार हिंदू अद्वैत सिद्धांतात ओशोंच्या कल्पनांचा उगम आहे. ओशोंचे समकालीन असणाऱ्या जिद्दू कृष्णमूर्तींनी ओशोमताशी सहमती दर्शविलेली नसली तरी दोहोंच्या उपदेशांमध्ये स्पष्ट साम्य आहे.
ओशोंच्या "दहा आज्ञा"
ओशो आचार्य रशनीश म्हणून वावरत असताना एका भक्ताने त्यांना ख्रिश्चन धर्मातील "टेन कमांडमेंट्स"च्या धर्तीवर ओशोंना त्यांच्या आज्ञा विचारल्या. तेव्हा याचे उत्तर देत ओशो म्हणाले की, आपण कसल्याही प्रकारच्या आज्ञेच्या विरोधात आहे. मात्र तुम्ही विचारतच असाल तर केवळ गंमतीसाठी मी या आज्ञा तुम्हाला सांगतो...
या सर्व आज्ञा प्रत्येक स्लाईडवर एक याप्रमाणे दिल्या आहेत...
पुढील स्लाईडवर पाहा, ओशोंच्या इतर ९ आज्ञा