आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षांच्या मुलाचे मृत वडिलांना पत्र, लिहिले- बाबा देवाला लिव्हरपूलच्या विजयाचे सांगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - द. आफ्रिकेला १९९५ मध्ये रग्बीमध्ये विश्वविजेता बनवणारा कर्णधार जुस्ट वान डेर वेस्थुईजेनचे मागच्या सोमवारी प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले. जुस्ट मागच्या सहा वर्षांपासून मोटार न्यूरोन आजाराने पीडित होता. या आजारात पीडित माणसांचे स्नायू एकेकाने दुबळे होत जातात आणि नंतर त्याचा मृत्यू होतो. जुस्टचा १० वर्षीय मुलगा जॉर्डनने वडिलांना एक भावनिक होऊन पत्र लिहिले आहे. त्याने लिहिले की, बाबा तुम्ही देवाच्या जवळ आहात. त्यांना लिव्हरपूलच्या टीमला विजयी करण्यास सांगा.   

लिव्हरपूलची टीम इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉलची टीम असून या सत्रात सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. जॉर्डनने लिहिले की, “प्रिय, बाबा जीवनात मला दिलेल्या प्रत्येक वस्तूसाठी तुमचे मनापासून आभार. नेहमी सर्वाेत्तम बनण्याचे प्रयत्न करण्यास शिकवल्याबद्दल सर्वाधिक धन्यवाद. तुम्ही जगातील सर्वोत्तम रग्बीपटू होता. मलासुद्धा तुमच्याप्रमाणे सर्वोत्तम खेळाडू बनायचे आहे. मी नेहमी तुमच्याशी प्रेम करत राहीन. बाबा, प्लीज, देवाला या वेळी लिव्हरपूलच्या टीमला विजयी करण्यास सांगा ना आणि हो.. कधीही एकटे फिरायला जाऊ नका. आय लव्ह यू सो मच..तुमचाच जॉर्डन.’  

जॉर्डनची आई आणि जुस्ट वॉन डेर वेस्थुईजेनची पत्नी तसेच गायिका एमोर विटोन म्हणाली, “जूस्ट खूपच सुंदर होता. त्याचे डोळे जगात सर्वांत सुंदर डोळे होते. ज्या आजारात अनेक जण फक्त सहा महिने जगू शकतात, त्या आजाराशी त्याने सहा वर्षे संघर्ष केला. त्याला आपल्या मुलांसाठी जगायचे होते. 
बातम्या आणखी आहेत...