आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

100 सीसी सेग्मेंटमध्‍ये पसंतीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बजाजने नुकतीच डिस्कव्हर 100 टी (टूरर) बाइक लाँच केली आहे. या बाइकचा परफॉर्मन्स कुठल्याही 125 सीसी बाइकपेक्षा कमी नाही. ही आतापर्यंतची सर्वात सुंदर 100 सीसी बाइक असल्याची चर्चा आहे. या नव्या बाइकचे डिझाइन डिस्कव्हर 125 एसटीशी मिळतेजुळते आहे. या बाइकला एक्झॉटिक, स्लिम-स्पोक आणि 17 इंच अ‍ॅलॉय व्हील आहेत. बाइकच्या फिनिशिंगमध्ये ब्लॅक कलरचा वापर केला आहे. इंजिन केस, एक्झॉस्ट आणि चेनवर ब्लॅक पेंट खुलून दिसत आहे. यात डीसी-पॉवर्ड हॅलोजन हेडलाइट, मेंटेनन्स-फ्री बॅटरी, ऑटो-चोक सिस्टिम आणि रिअर-व्ह्यू मिरर आहे. ऑ टो-चोक सिस्टिमने बाइक सुरू करणे सोपे जाते. रिअर-व्ह्यूमध्ये व्हिजनची अडचण नाही. बाइकचे स्पीडोमीटर पुन्हा डिझाइन केल्यामुळे जास्त वेगातही त्यावरील रिडिंग वाचता येते. बाइकची फिट-अँड-फिनिश परफेक्ट आहे. बाइकचे डिझाइन बदलल्यामुळे ही गाडी चालवताना तरुणाईला राइडचा विशेष आनंद मिळेल.