आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१०४ वर्षांच्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. संजय गुप्ता, आॅर्थोपेडिक सर्जन
जन्म - २१ डिसेंबर १९७१
वडील - केदारनाथ गुप्ता (अभियंता होते), सुशीलादेवी (गृहिणी), एक भाऊ, दोन बहिणी
कुटुंब - डॉ. श्वेता गुप्ता (पत्नी), दोन मुले
शिक्षण - एस. एन. मेडिकल कॉलेज आग्रा येथून एमबीबीएस, युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, यूकेतून एमसीएच (ऑर्थोपेडिक्स व जॉइंट रिप्लेसमेंट)

जन्म - २१ डिसेंबर १९७१
वडील - केदारनाथ गुप्ता (अभियंता होते), सुशीलादेवी (गृहिणी), एक भाऊ, दोन बहिणी
कुटुंब - डॉ. श्वेता गुप्ता (पत्नी), दोन मुले
शिक्षण - एस. एन. मेडिकल कॉलेज आग्रा येथून एमबीबीएस, युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूल, यूकेतून एमसीएच (ऑर्थोपेडिक्स व जॉइंट रिप्लेसमेंट)

मातेश्वरीदेवी नावाच्या १०४ वर्षांच्या महिलेस रुग्णालयात दाखल केले तेव्हा उतारवयात शस्त्रक्रिया करणे कठीण होईल, असे वाटले. त्यांच्या बॉल जॉइंटमध्ये फ्रॅक्चर होते आणि या वयात त्यावर शस्त्रक्रिया करणे संकटाला निमंत्रण देण्यासारखे होते. यासोबत मातेश्वरीदेवींच्या शस्त्रक्रियेआधी करण्यात आलेल्या चाचण्यांत त्यांना ब्रॉन्काइल अस्थमा असल्याचे निदान झाले. अशा स्थितीत शस्त्रक्रिया केल्याने अवयव गमावण्याचा धोका वाढतो. याशिवाय महिलेस हायपर थायरॉइड, किडनी आणि मणक्याचे हाड लहान असण्याची समस्या होती. मात्र, डॉ. गुप्ता यांच्या टीमने याचे आव्हान स्वीकारले. त्यांच्या नातेवाइकांना यासाठी तयार केले.
उतारवयातील रुग्णावर अशी शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान होते. त्यामुळे त्यांनी टीमसोबत मॉक ड्रील केले. सर्वकाही सुरळीत झाल्यास एका तासात शस्त्रक्रिया होईल, असे शस्त्रक्रियेआधी वाटत होते. मात्र, शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात ती पूर्ण केली.
एमबीबीएस करताना गुप्ता यांना सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी १४ वर्षांच्या करिअरमध्ये गुडघा प्रत्यारोपणाच्या पाच हजारांहून जास्त शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यांचे तीसहून जास्त शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मासिकात प्रकाशित झाले आहेत. मध्य प्रदेशच्या गुना आणि कोरबा (सध्या छत्तीसगड) येथे शिकलेल्या डॉ. गुप्तांच्या पत्नीही डॉक्टर असून त्या आयव्हीएफ तज्ज्ञ आहेत.
बातम्या आणखी आहेत...