आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

114 वर्षांपूर्वीचे रशियन जहाज ऐतिहासिक वस्तूंचे दालन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रशियातील प्रसिद्ध ‘अरोरा’ क्रूझर हे आता पुराण वस्तुसंग्रहालय म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सेंट पीटर्सबर्गमधील नेवा नदीवर हे जहाज थांबवण्यात आले आहे. हे जहाज ११४ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. अशा प्रकारची तीन जहाजे रशिया-जपान युद्धात वापरण्यात आली होती. १९०४-१९०५ मध्ये सशिमाच्या युद्धात अरोरा जहाज सुरक्षितरीत्या अमेरिकी संरक्षणात फिलिपाइन्सला आणण्यात आले. नंतर बाल्टिक सागरात आणले गेले.  पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हे जहाज वापरण्यात आले होते. आज सेंट पीटर्सबर्गमधील प्रसिद्ध स्थळांमध्ये या जहाजाचा समावेश आहे. दोन वर्षांच्या डागडुजीनंतर काही दिवसांपूर्वी ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले.  
 
- रशियात मोठ्या जहाजांना राजांची नावेच दिली जातात. यात वर्याग, बोगात्यर, बोयारिन, पोल्कन, नेपच्यून, निकोलस द्वितीय इत्यादींचा समावेश आहे. अरोरा या एकाच जहाजाला ग्रीक देवीचे नाव देण्यात आले आहे.
rbth.com
 
बातम्या आणखी आहेत...