ब्रिटनमधील प्रत्येक नागरिकाला ‘सेटल कार्लिसल ट्रेन’ची सफर एकदा तरी करण्याची इच्छा असते. याचे कारण म्हणजे ही ट्रेन आणि तिच्या प्रवासादरम्यानचे निसर्गसौंदर्य. ११५ किलोमीटरच्या प्रवासात ही ट्रेन २० मोठे पूल आणि १४ भुयारांतून जाते. काही महिन्यांपूर्वी रेल्वेच्या मार्गात भूस्खलन झाल्यामुळे तिची सेवा खंडित झाली होती.
१४ फेब्रुवारी रोजी नवे टोर्नेडो इंजिन घेऊन ही ट्रेन पुन्हा एकदा ट्रॅकवर धावू लागली. तीन दिवसांत ट्रेनच्या १२ फेऱ्या झाल्या. त्यात ५ हजारांहून अधिक प्रवाशांनी पर्यटन केले.
ट्रेनची सेवा पुन्हा सुरू होणार कळल्यावर नागरिकांनी भराभर तिकिटे विकत घेतली. शेकडो लोकांना १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेलाच ट्रेनमध्ये प्रवास करायचा होता, मात्र त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही.
- ब्रिटनमधील उत्तर रेल्वे विभागाचे संचालक पॉल बर्नफील्ड म्हणतात, आजही नागरिकांचा ऐतिहासिक ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठीचा उत्साह पाहून मला खूप आनंद झाला. वाफेच्या इंजिनावरची ही पहिली ट्रेन असून ती पाच दशकांपासून सेवारत आहे. प्रवाशांना सेवा देणारे हे तिचे १४१ वे वर्ष आहे.