आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा क्षेत्रामध्ये 2025 पर्यंत दरवर्षी 2 लाख नोकऱ्यांची संधी, विविध विभागांत आहे संधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमा उद्योगाचा शहराशिवाय ग्रामीण भागातही मोठा विस्तार झालेला आहे. एका अहवालानुसार २०१६ वर्षाअखेरीस सुमारे ३६ कोटी लोकांकडे आयुर्विमा होता. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के अाहे. आगामी काळात यात आणखी विस्तार होणार असल्याने या क्षेत्रात मनुष्यबळाचीही तितकीच गरज भासणार आहे. 
 
विमा क्षेत्र हे करिअरच्या दृष्टीने उत्तम आणि सुरक्षित क्षेत्र मानले जाते. या क्षेत्रात अनेक नवनवीन कंपन्या येत असल्याने विमाविषयक मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. अर्थात विमा क्षेत्राचा ज्याप्रमाणे शहरी भागांमध्ये विस्तार झाला आहे. तसाच ग्रामीण भागातही झाल्याचे दिसून येते आणि हेच मनुष्यबळ मागणीमागील प्रमुख कारण कारण आहे.  कन्फेडरेशन अँड इंडियन इंडस्ट्रीनुसार विमा क्षेत्रात २०२५ अखेरपर्यंत सुमारे २० लाख नवीन नोकऱ्या उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. दरवर्षी या क्षेत्रात अंदाजे २ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. 
 
देशाच्या विमा क्षेत्रात ५३ कंपन्या आहेत. यातील २४ आयुर्विमा आणि २९ बिगर आयुर्विमा प्रकारातील कंपन्या आहेत. अहवालानुसार ३६ कोटी लोक आयुर्विमा अंतर्गत होते. ही संख्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के आहे.  २०१५-२०१६ दरम्यान आयुर्विमा क्षेत्रात  २२.२५ टक्के विकास झाला आणि यातून २०.३४ अब्ज डॉलरचा महसूल निर्माण झाला. तर देशाचे बिगर आयुर्विमा क्षेत्र २००४ ते २०१६ दरम्यान १२.१ टक्के वाढली. २००४ मध्ये यांचा एकूण फायदा ३.४ अब्ज डाॅलर होता, जो २०१६ साली वाढून १३.३५ अब्ज डॉलर झाला. हे आकडेच विमा क्षेत्र किती वेगाने वाढत आहे, याचे द्योतक आहे. यामुळेच या क्षेत्रात नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.  
 
विमा क्षेत्राच्या विमा विभागात नोकरीची संधी आहे. हा विभाग नवीन पॉलिसी बनविणे आणि चालू पॉलिसीत वेळोवेळी बदल करण्याचे काम करतो. आयुर्विमा आणि जनरल विमा यांचा प्रारूप आराखडा तयार करणे आणि पॉलिसीची किंमत ठरविणे हे काम या विभागाचे आहे. कंपनीची जोखीम अंडररायटर कमी करतो. एखाद्या व्यक्तीला पॉलिसी द्यावी की न द्यावी हे हा विभाग ठरवितो. मार्केर्टिंगसाठी विशेष पदवी गरजेची असते. आता तर एजंट लोकांची भूमिकाही बदलत आहे. ते आता विमाविषयक समस्या सोडविण्याबरोबरच वित्तीय सल्लागार म्हणूनही काम करत आहेत.  अनेक संस्था आहेत मार्केटिंगचा विशेष अभ्यासक्रम चालवतात आणि तो नोकरीसाठी उपयुक्त आहे. 
 
आयआरडीएद्वारा आयोजित परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते 
बारावी पास झाल्यानंतर विमा क्षेत्रात  करिअर करता येते. यासाठी प्रशिक्षण घ्यावे लागते आणि नंतर भारतीय जीवन बिमा निगम प्राधिकरण यांच्या वतीने घेतली जाणारी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. परंतु पदवी घेतल्यानंतरच या क्षेत्रात येणे चांगले. त्यातही संबंधित शाखेत पदवी घेणाऱ्यास प्राधान्य मिळते. यासाठी इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट कोर्स करू शकता. बहुतेक संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम पदव्यूत्तर पदवी स्तरावर आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर इन्शुरन्स अँड रिस्क मॅनेजमेंट चा पीजी डिप्लोमा किंवा एमबीएला प्रवेश घेऊ शकतो. गणित, सांख्यिकी, अर्थशास्त्र किंवा वाणिज्य शाखेतील पदवीधरांसाठी या  क्षेत्रात प्रवेश सुलभ होतो.  
 
विविध  विभागांत आहे संधी
उत्तम मनुष्यबळासाठी विविध विमा कंपन्यांत चांगल्या संधी आहेत. यामध्ये  व्यवसायिक बाजार, अॅक्चुअरी, अंडररायटिंग आणि ऑपरेशन डिपार्टमेंटमध्ये काम करू शकता. याशिवाय कंपन्यांमध्ये मार्केटिंग आणि वितरण विभागातही मनुष्यबळासाठी नोकरीच्या शक्यता आहेत. सरकारी विमा कंपन्यांमध्येही विकास अधिकारी म्हणून प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून नियुक्ती होते.  
 
दिवाणाची कमाई जास्त
या क्षेत्रातील विमा एजंटांची कमाई बहुतेक वेळा त्यांनी विकलेल्या पॉलिसीवर अवलंबून असते. मार्केटिंग आणि सेल्स विभागात नवोदितांना दरमहा २० ते २२ हजार मिळू शकतात.  अंडररायटर्सना सुरुवातीला वार्षिक ५ ते ६ लाखंाचे पॅकेज मिळते. विमा व्यवस्थापन पदवीधारकांना वार्षिक ३ ते ४ लाख रुपये पॅकेज मिळते तर अॅक्चुअरी  (दिवाण) व्यवसायिकास सुरुवातीलाच वार्षिक ७ ते ८ लाख रुपयांचे पॅकेज मिळते.  अर्थव्यवस्था आणि लोकांचे कमाईचे स्त्रोत वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्शुरन्स क्षेत्रातील वाढत्या संधी युवकांना खुणावत आहेत.
बातम्या आणखी आहेत...