आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसाव्या वर्षी हे सर्व माहीत असते तर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विसाव्या वर्षी काही गोष्टी माहीत असत्या तर आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असता, अशा गोष्टी जाणून घेऊयात... .
*18 पेक्षा जास्त वयाच्या लोकांवर अवलंबून राहता येत नसेल तर त्यांच्यापासून दूर राहा.
*20 व्या वर्षी शरीरात अद्भुत ऊर्जा असते. तुम्ही खूप सृजनात्मक असता. खूप कमी जण तुमचे महत्त्व ओळखतात. त्यामुळे आपला प्रचार स्वत: करा. स्वत:च्या पात्रता व क्षमता सादर करा.
*इतरांकडून अपेक्षा केल्याने निराशाच हाती येते. फक्त स्वत:कडून अपेक्षा केल्याने सकारात्मक विचार येतात.
*स्वत:शी आणि इतरांशी खरे बोलण्याने आयुष्य सुलभ होते, पण बोलण्यात कोरडेपणा ठेवू नका.
*काहीजण स्वत:च्या फायद्यासाठी कोणतेही मार्ग अवलंबतात. अशा प्रकारच्या लोकांपासून दूर राहा. अशा लोकांच्या विचारसरणीविरोधात आवाज उठवा.
* तुमच्या क्षेत्राशिवाय इतर कॉर्पोरेट कंपनीत काम करावे वाटत असेल, तर आतापासूनच सुरुवात करा. काही कंपन्या शिकवणी व मार्गदर्शन करतात. त्यासाठी फारसा खर्च येत नाही.
*या वयात कपडे, बूट खरेदी करण्याऐवजी ज्ञान आणि अनुभव मिळवा.
* विसाव्या वर्षी बचत सुरू करा. पगारातून किंवा पॉकेटमनीतून पैसे बाजूला ठेवत जा.
*दररोज नवा अनुभव घेतल्याने आयुष्य जगण्याऐवजी सुंदर पद्धतीने जगता येते.