आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅजेटशिवायही 24 तास घालवणे सहज शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्हाला जर कुणी मोबाइल, टॅब्लेट, लॅपटॉपपासून दूर राहायला सांगितले तर ते अशक्य वाटेल. परंतु आठवडा- दहा दिवसांतून एकदा तंत्रज्ञानापासून दूर राहायला हवे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूने त्यासंबंधी दिलेली महत्वाची माहिती...

एका स्लाइडवर एकच मुद्दा लिहा
कोणतीही नवीन चर्चा सुरू करण्यापूर्वी आराखडा तयार करा. एक स्टोरीबोर्ड ठेवा. त्यामुळे वेळेची बचत होईल. त्यामध्ये तुमच्या कल्पना नमूद करा. जागा कमी असल्यामुळे कमीत कमी शब्दांचा वापर करा. एका स्लाइडवर एकच कल्पना लिहा. एकाच स्लाइडवर जास्त मुद्दे कोंबू नका. त्यामुळे तुमची काय इच्छा आहे आणि तुम्हाला नेमके काय हवे आहे, हे समजून घेणे सोपे जाईल. स्टोरी बोर्डमुळे तुम्ही तुमचा मुद्दा सहजपणे मांडू शकाल.
(स्रोत : हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू, ‘गाइड टू पर्स्युव्हेसिव्ह प्रेझेंटेशन्स’)

भाषण झोडू नका, चर्चेतून होईल सुधारणा
चांगले सेल्समन विक्रीकडे व्यवहार म्हणून नव्हे, तर सल्ला म्हणून पाहतात. ग्राहकाला कोणत्याही पद्धतीने उत्पादनावरील ऑफरव्यतिरिक्त अन्य लाभ देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तुम्हाला तुमचे पक्षकार किंवा ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण ठरण्याचे हे तीन उपाय येथे दिले आहेत...
० कोणत्याही समस्येवर थेट भाषण झोडण्याऐवजी ग्राहकांशी चर्चा करा. विशिष्ट मुद्द्याच्या खोलात जाऊन त्यावरील तोडगा सुचवा.
० तुमच्या लक्षात आले तर ग्राहकाला त्यांनी हुकवलेल्या संधींबाबत सांगा. त्यांच्या व्यवसायात भर पडेल असे तंत्रज्ञानातील नवे प्रवाह, विपणन इत्यादींचा त्यात समावेश असेल.
० गरज भासेल तेव्हाच पक्षकाराला अन्य ठिकाणी पाठवा. तुम्ही जे देत आहात ते सर्वच ग्राहकांसाठी आवश्यक असेलच असे नाही.
(स्रोत: ‘गुड कस्टमर्स पे फॉर युवर सेल्स कॉल्स?’, लेखक : स्कॉट एडिनगर)

गॅजेटपासून दूर राहा, फायदाच होईल
तंत्रज्ञानापासून काही वेळ दूर राहण्याचे अनेक वैयक्तिक फायदे आहेत. ते फायदे उचलण्यासाठी संधीची वाट पाहू नका. आठवड्यातून एकदा तरी त्यांना विसरा. संगणक, टॅब्लेट, मोबाइल हे सर्व शुक्रवारी रात्री बंद करा. तुमच्या नजरेपासून दूर ठेवण्यासाठी ते एखाद्या कपाटात ठेवा. शनिवारी रात्र होईपर्यंत ते तसेच राहू द्या. 24 तास पूर्ण होऊ द्या. त्यानंतर आनंद घ्या आणि जे करायचे असेल ते करा. मुलांसोबत वेळ घालवा, पुस्तके वाचा. दिवस खूपच मोठा आहे, असे तुम्हाला वाटेल आणि तुम्ही ताजेतवाने व्हाल.
(स्रोत : एचबीआर, ‘टॅक्स बेस्ट फीचर : द ऑफ स्वीच’, लेखक : टिफनी शलेन)