Home »Divya Marathi Special» 30 Crore Expenses On Cinema In Every Week

दर आठवड्याला 30 कोटी सिनेमावर खर्च

चंद्रकांत शिंदे | Jan 05, 2013, 23:25 PM IST

  • दर आठवड्याला 30 कोटी सिनेमावर खर्च

मुंबई- भारतीय प्रेक्षकांनी मागील वर्षी चित्रपट पाहण्यासाठी प्रत्येक आठवड्याला सुमारे 30 कोटी रुपये खर्च केले आहेत. देशातील एकूण 12 हजार 900 स्क्रीन्समध्ये हिंदी, इंग्रजी व डब असे एकूण 150 चित्रपट प्रदर्शित झाले. या चित्रपटांमधून 2200 कोटींचा गल्ला गोळा झाल्याचे समजते. यामध्ये कमाईचा मल्टिप्लेक्सचा सगळ्यात मोठा वाटा आहे. देशात 1400 मल्टिप्लेक्स स्क्रीन असून त्यांचे तिकीट दर 150 रुपयांपासून 350-450 रुपयांपर्यंत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुटी आल्याने जवळजवळ 80 ते 85 टक्के व्यवसाय झाला आहे.


प्रेक्षकांनी सर्व प्रकारच्या चित्रपटांना औदार्याने आश्रय दिला. कहानी, विकी डोनर अशा छोट्या बजेटच्या चित्रपटांबरोबरच अर्जुन कपूर व परिणीता चोप्राच्या इशकजादे व करण जोहरच्या स्टुडंट ऑफ द इयर अशा चित्रपटांनाही त्यांनी डोक्यावर घेतले.

Next Article

Recommended