आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

४० रुपये देणाऱ्या मशीनमधून ३१ लाख काढले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जर्मनीत अनेक ठिकाणी बाटल्यांचा पुनर्वापर करणाऱ्या मशिन्स बसवलेल्या आहेत. कोलोन शहरातील पेयांच्या एका दुकानातही ही मशीन बसवण्यात आली होती. यात एक बाटली टाकली असता अर्धा युरो म्हणजेच ४० रुपये बाहेर येतात. मात्र, एका तरुणाने चलाखी करत बाटली न टाकता मशीनमधून टप्प्याटप्प्याने ३१ लाख रुपये काढले.
या मशीनचा वापर जास्तीत जास्त करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन म्हणून हे पैसे दिले जात असत. मात्र, या तरुणाने मोठ्या शिताफीने मशीनवर डल्ला मारला. या तरुणाला तत्काळ पकडण्यात आले असून त्याला १० महिन्यांची शिक्षा दिली आहे.
कोर्टात झालेल्या सुनावणीत या तरुणाने मशीन कशा प्रकारे लुटली, याचे स्पष्टीकरण दिले. मशीनमध्ये मॅग्नेटिक सेन्सर बसवले आणि एक लांब छिद्र पाडले. त्यामुळे मशीनमध्ये बाटली टाकली तरी पावतीसोबत पैसे बाहेर येत होते तसेच बाटलीदेखील बाहेर येत होती.
मात्र यासाठी त्याला अनेक वेळा बाटली टाकावी लागली असेल, असा युक्तिवाद केला असता या तरुणाने ३१ लाख रुपये काढण्यासाठी तब्बल ७७ हजार ४५१ वेळा असे केल्याचे कबूल केले.
बातम्या आणखी आहेत...