आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 वर्षापूर्वी इंदिरांनी जाहीर केली होती आणीबाणी, वाचा घटनाक्रम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी... - Divya Marathi
फाईल फोटो- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी...
देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा करत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 40 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी आणीबाणी जाहीर केली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या आणीबाणीच्या या अंधारयुगाला आज 40 वर्षे पूर्ण होत आहेत. इंदिरा गांधींनी 25 जूनच्या रात्री आणीबाणी जाहीर केली. तर 26 जून रोजी सकाळी आठ वाजता आकाशवाणीवरून देशातील जनतेला उद्देशून भाषण केले होते.
देशात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे स्थैर्य आणि सार्वभौमत्व धोक्यात आणले गेले आहे. सामान्य लोकांना भडकावले जात आहे आणि कायदा, सुव्यवस्था व शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सरकारला काही कठोर पावले उचलणे भाग पडले आहे. त्याचाच भाग म्हणून देशात आणीबाणी जाहीर करीत आहे, असे सांगत इंदिरा यांनी याचे समर्थन केले होते.
खाली वाचा या आणीबाणीचा घटनाक्रम
12 जून 1975 - निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी 1971च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.
22 जून 1975 - जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.
24 जून 1975 - अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य होण्यास गांधी परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.

25 जून 1975 - देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.
30 जून 1975 - अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना थेट अटक करण्यास सुरवात झाली.
1 जुलै 1975 - आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.
5 जुलै 1975 - जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी 26 संघटनांवर बंदी घालण्यात आली.
23 जुलै 1975 - आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.
24 जुलै 1975 - लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.
5 ऑगस्ट 1975 - अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.

21 मे 1976 - न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.
25 ऑगस्ट 1976 - विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.
3 नोव्हेंबर 1976 - घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.
1 सप्टेंबर 1976 - लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरवात.

18 जानेवारी 1977- लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.
20 जानेवारी 1977- लोकसभा विसर्जित करण्यात आली.
24 जानेवारी 1977- मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
11 फेब्रुवारी 1977 - राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांचे निधन.
21 मार्च 1977 - आणीबाणी मागे घेण्यात आली.
22 मार्च 1977- जनता पक्षाला निवडणुकीत बहुमत.
पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, इंदिरांनी कोणत्या स्थितीत जाहीर केली आणीबाणी...तसेच आणीबाणीसंबंधीची सर्व माहिती...
बातम्या आणखी आहेत...