Home »Health And Lifestyle» 5 Reasons Most Tension In Women

महिलांमध्ये तणावाची ही अाहेत 5 सर्वात मुख्य कारणे

दिव्य मराठी | Apr 16, 2017, 13:23 PM IST

अापल्या देशात बहुतेक महिला अापण कुठल्या तरी तणावात अाहाेत, हे स्वीकारण्यास पुढे येत नाहीत. खरे तर प्रत्येक चारमधील एका महिलेला जीवनात कधी ना कधी तरी माेठ्या तणावाचा सामना करावा लागताे. महिलांमध्ये तणावाच्या वाढणाऱ्या धाेक्याला हाॅर्माेनच्या स्तराच्या बदलाशी जाेडले जाते. परंतु याची अनेक कारणे असू शकतात. जे जीवनात वेगवेगळ्या घटनांशी संबंधित असतात. आज डॉ. पी वर्मा, मानसशास्त्रज्ञ, नवी दिल्लीया सांगत आहेत महिलांमध्ये तणावाची 5 कारणे...

र्भावस्थेच्या काळात : हे शहरात राहणाऱ्या महिलांसाठी तणावाचे माेठे कारण अाहे. अाराेग्याच्या दृष्टीने असे मानले जाते की, प्रेग्नेंसीवेळी महिलांसाठी उदास अाणि बेशुद्ध हाेण्याची माेठी जाेखीम असते. जर याेग्य काळजी अाणि लक्ष दिले नाही तर, गर्भावस्थेसंबंधी परिणाम प्रदीर्घ काळापर्यंत राहताे अाणि गर्भातील बाळाच्या विकासाला बाधा ठरू शकताे. साधारणत: लठ्ठ अाणि अन्य कारणांनी त्रस्त महिलांना गर्भधारणेच्या काळात याची अधिक शक्यता असते.

Next Article

Recommended