आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५० हजार कर्मचारी, ३ हजार शाखांत ११ पर्यंत काम करताहेत, घोळ फक्त २ जागी, शिखा शर्मा यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चुकीच्या पद्धतीने नोटा बदलल्यामुळे गेल्या आठवड्यात चर्चेत आलेल्या अॅक्सिस बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक शिखा शर्मा यांना ‘दिव्य मराठी’ नेटवर्कच्या वतीने असे का होत आहे, असा प्रश्न केला.

बँकेचे दोन अधिकारी, सीएला अटक झाली आहे?
शिखा शर्मा - आमच्या तीन हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत. त्यात ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन आठवड्यांत ७० लाख खातेधारकांना सेवा दिली. रात्री सुमारे १० ते ११ वाजेपर्यंत काम सुरू होते. दोन शाखांमध्ये घोळ झाल्याचे आम्हालाही दु:ख आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर्व व्यवहारावर आमचे लक्ष असून आतापर्यंत २४ कर्मचाऱ्यांवर आम्ही कारवाई केली आहे.

घोळ झाल्याची बँकेच्या आधी सरकारला माहिती मिळाली?
शिखा शर्मा - आम्हाला कसे माहिती होईल. चलनात बदल होण्याचे जगातील सर्वात मोठे काम पहिल्यांदाच होत आहे. काय झाले, काय नाही झाले, याचा अंदाज लावता येईल? याच्या आधी असा घोळ झालेला नाही. याचा आम्ही विचारदेखील करू शकत नाही. मात्र, माहिती होताच जे केले ते महत्त्वाचे आहे. ईडीकडून माहिती मिळताच कारवाई केली आहे.

या मुळे बँकेच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असे तुम्हाला वाटते का?
शिखा शर्मा - घोळ करणारे १० कर्मचारी होते की २० यामुळे फरक पडत नाही. त्यांच्या चुकीच्या कामामुळे बँकेची प्रतिष्ठा खराब झाली आहे. मात्र, आम्ही प्रतिष्ठा परत संपादित करू, याचा विश्वास आहे.
बातम्या आणखी आहेत...