आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 वर्षांत संपत्तीत तब्बल 775 टक्के वाढ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

@येदुगुडी सनदिन्ती जगनमोहन रेड्डी : वायएसआर काँग्रेसचे प्रमुख
> जन्म : 21 डिसेंबर 1972, पुलीवेंदुला, जिल्हा कडप्पा, आंध्र प्रदेश
> शिक्षण : प्राथमिक पुलीवेंदुला, बीकॉम व एमबीए हादराबादेत
> कुटुंब : आई -विजयालक्ष्मी, वडील वाय. एस. आर. रेड्डी, पत्नी भारती व दोन मुली.
जगन यांनी 2004 मध्येच राजकारणात प्रवेश केला आहे. 2009 मध्ये कडप्पामधून ते काँग्रेसचे खासदार म्हणून निवडूनही आले होते. जगननेच 2008 मध्ये साक्षी वाहिनी आणि वृत्तपत्र सुरू केले. प्रत्येक गोष्टीमध्ये ते बँडला महत्त्व देतात. त्यामुळेच वृत्तपत्र सुरू केले तेव्हा जगातील सर्वोत्कृष्ट न्यूज पेपर डिझायनर मारियो गार्सिया यांच्याकडून त्यांनी डिझाइन तयार करून घेतले. या पिता-पुत्रांवर जनतेचे इतके प्रेम होते की, या वृत्तपत्राची सुरुवातीचा खप हा 12 लाख 86 हजार 70 एवढा होता. पत्नी भारतीच्या नावाने सुरू केलेल्या भारती सिमेंटचे मालकही तेच होते. त्यांच्या अटकेनंतर पत्नीने जबाबदारी स्वीकारली.
त्यांची प्रगती इतक्या वेगाने होत होती की, जगातील प्रसिद्ध व्यावसायिकांची गतीही त्यांच्यापेक्षा खूप कमी वाटत होती. कारण 2003-04 मध्ये जगन यांनी जाहीर केलेले उत्पन्न 19 लाख रुपयांच्या जवळपास होते. 2004 मध्ये त्यांचे वडील मुख्यमंत्री बनल्यानंतर यामध्ये वेगाने वाढ झाली. त्यानंतर पाच वर्षांनी निवडणुकांच्या वेळी त्यांनी जाहीर केलेले उत्पन्न 77 कोटी 40 लाख एवढे होते. त्यात तब्बल 775 टक्के वाढ झाली आणि 2010-11 मध्ये ती 500 कोटींच्या आसपास होती. काही वर्षांतच संपत्तीत एवढी वाढ पाहून अनेकांचे डोळे विस्फारले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी काँग्रेस नेतृत्वाकडे शोकयात्रा काढण्याची परवानगी मागितली. मात्र, त्यांना परवानगी मिळाली नाही. तरीही त्यांनी यात्रा काढली. त्याचा परिणाम म्हणजे त्यांना 16 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला. रेड्डी कुटुंबाचे नाव कधीही वादात आले नव्हते, पण बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जगनला तुरुंगात जावे लागले.