आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची 81 % पदे रिक्तच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्या लोकसंख्येपैकी जवळपास १७. ५ टक्के लोक भारतात राहतात. पण जगभरातील रोगांचा जवळपास २० टक्के भाग देशात आहे. याच्या तुलनेत उपलब्ध डॉक्टरांची संख्या गरजेपेक्षा कमी आहे. कुशल व्यावसायिकांच्या कमतरतेमुळे हेल्थकेअर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना करिअरसाठी एक उत्तम पर्याय होऊ शकतो. मेडिकल काैन्सिल ऑफ इंडियानुसार देशभरात २०१७ मध्ये १०. १२ लाख अॅलोपॅथिक डॉक्टर आहेत. काैन्सिलनुसार यातील ८० टक्के म्हणजे ८. १० लाख अॅक्टिव्ह सेवेत आहेत. देशात डॉक्टर पॉप्युलेशन रेशो जवळपास १: १५६० आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार हे प्रमाण १: १००० असे असायला हवे.  
इंडिया स्पेंडच्या मार्च, २०१६ मध्ये राज्यसभेत सादर केलेल्या द फंक्शनिंग ऑफ मेडिकल काैन्सिल ऑफ इंडियाच्या अहवालानुसार विश्लेषणानुसार देशभरात जवळपास ५ लाख डॉक्टरांची कमतरता आहे. अहवालानुसार प्राथमिक हेल्थकेअर सेंटर, जे ८० कोटींहून अधिक ग्रामीण लोकसंख्येला सामावून घेतात, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे संघर्ष करत आहेत. यात सर्जनचे ८३. ४ टक्के, ऑब्स्टेट्रिशियन व गायनॅकॉलॉजिस्ट ७६. ३ टक्के, फिजिशियन ८३ टक्के आणि पेडिट्रिशियनची ८२.१ टक्के पदे रिक्त आहेत. अशा प्रकारे कम्युनिटी हेल्थकेअर क्षेत्रात ८१ टक्के विशेषज्ञांची पदे रिक्त आहेत. कम्युनिटी हेल्थकेअर केंद्रात स्वीकृत पदांमध्ये सर्जनच्या ७४.६ टक्के ऑब्स्टेट्रिशियन व गायनॅकॉलॉजिस्ट ६५.४ टक्के, फिजिशियन ६८.१ टक्के आणि पेडिट्रिशियनच्या ६२. ८ टक्के जागा रिक्त आहेत.   
 
तथापि, हेल्थकेअरचा बाजार वेगाने वाढत आहे. आयबीईएफच्या अहवालानुसार सध्या देशाचा हेल्थकेअर बाजार जवळपास १०० अब्ज डॉलरचा आहे आणि २०२० च्या अखेरपर्यंत हा जवळपास तिप्पट अर्थात २८० अब्ज डॉलरचा होऊन जाईल. हा २२.९ टक्के वार्षिक दराने वाढतोय. यात ६५ टक्के भागीदारी रुग्णालये, नर्सिंग होम आणि फार्मास्युटिकल्सची आहे. तेच आरोग्याच्या क्षेत्रात प्रतिव्यक्ती खर्चात वाढ होईल. २०१० मध्ये प्रतिव्यक्ती खर्च ५४ डॉलरवरून वाढून २०१५ मध्ये ६८ डॉलर प्रतिव्यक्ती झाला आहे.  
 
पदवी व इंटर्नशिप आवश्यक  : ५० टक्के अंकासह विज्ञान शाखा प्रवाहातून बारावी करणारे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर बनवू शकतात. यासाठी आवश्यक आहे की, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी विषय असावा. यानंतर विद्यार्थी राष्ट्रीय पात्रता वा प्रवेश चाचणीच्या योग्य गुणांकनाच्या आधारावर देशभराच्या विविध मेडिकल कॉलेजांत एमबीबीएस वा बीडीएसमध्ये प्रवेश घेऊ शकतात. कोर्सनंतर इंटर्नशिप आवश्यक असते. विशेषज्ञता मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी करणे आवश्यक आहे. पदवी करणारे विद्यार्थी नीट पीजीच्या माध्यमाशी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी कोर्स, जसे की एमडी, डीएम, एमडीएस, एमसीएच आदींमध्ये प्रवेश घेऊ शकतात. काही संस्थांच्या पदव्युत्तर पदवीस प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असते की, विद्यार्थी मेडिकल काैन्सिल ऑफ इंडिया वा स्टेट काैन्सिल ऑफ इंडियात रजिस्टर्ड असावेत. याशिवाय प्रयोगशाळा तंत्रज्ञ, नर्स, रेडिओग्राफर आदींशी संबंधित कोर्सही नोकरीत साहाय्यभूत ठरू शकतात.  
 
सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रांत आहेत नोकरीच्या शक्यता: खासगी, सरकारी दोन्ही क्षेत्रांत नोकरीच्या संधी विद्यार्थी सरकारी रुग्णालये, नर्सिंगहोम, खासगी रुग्णालये, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रात नोकरी संधी. स्वत:चे क्लिनिकचा पर्यायही असतो. स्पेशालिस्ट डॉक्टरांच्या कमतरतेमुळे या क्षेत्रात नोकरीच्या शक्यता उत्तम आहेत.  
 
वेतन पॅकेजही चांगले  : या क्षेत्रात सॅलरी संस्थेनुसारच वेगवेगळी असू शकते. करिअर सुरू करणाऱ्याला २० ते २५ हजार रुपये प्रतिमहाचे सरासरी पॅकेज मिळू शकते. खासगी संस्थांमध्ये हे अधिकही असू शकते. काही वर्षांच्या अनुभवानंतर सॅलरी पॅकेज ४० ते ५० हजार रुपये प्रतिमहा होण्याची शक्यता असते. विशेषज्ञ डॉक्टरांना वेतनाचे पॅकेज प्रारंभीपासूनच सरासरीपेक्षा अधिक असू शकते.  
बातम्या आणखी आहेत...