आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या ९९ व्या वर्षीही गरजू मुलांसाठी ड्रेस बनवणारी वृद्धा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लिलियन वेबर सर्व वयोगटांसाठी प्रेरणादायक ठरल्या आहेत. त्या दररोज एका गरजू मुलासाठी सुंदर ड्रेस तयार करतात. गेल्या काही वर्षांत त्यांनी सुमारे ९०० हून अधिक ड्रेस आफ्रिकन मुलींसाठी बनवून दिले आहेत. ९९ व्या वर्षीही त्यांना थकवा जाणवलेला नाही. तासंतास शिलाई मशीनवर बसलेल्या असतात. रोज एक नवा ड्रेस ते शिवायला घेतात आणि संध्याकाळ होता- तो पूर्ण झालेला असतो. त्यांचा प्रत्येक ड्रेस चांगलाच असला पाहिजे. कारण तो घालणाऱ्याला आनंद व्हावा, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. एक माहिहतीपट पाहिल्यानंतर ड्रेस बनवण्याची प्रेरणा त्यांना मिळाली होती. त्यांनी बनवलेले ड्रेस त्या एका स्वयंसेवी संस्थेला देतात. या संस्थेने आतापर्यंत ४७ देशांत २५ लाखांहून अधिक ड्रेस वाटले आहेत.
huffingtonpost.com